नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध मतदार मो. नफिस खान यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेली निवडणूक याचिका अर्थहीन आहे, असा दावा करणाऱ्या अर्जावर निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष अर्जावर सुनावणी झाली.नितीन गडकरी मे-२०१९ मध्ये लोकसभेच्या नागपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. दरम्यान, त्यांनी या निवडणुकीत झालेल्या खर्चाचा योग्य हिशेब सादर केला नाही. निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी खरे उत्पन्न लपवून ठेवले. उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नागपूर मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे मो. नफिस खान यांचे म्हणणे आहे.
निवडणूक याचिकेवर गडकरींच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 6:15 AM