शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

नागपुरात वाहन कर्जाच्या नावे १६ लाखांनी फसवणाऱ्यास न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 7:49 PM

वाहन कर्जाच्या नावे फसवेगिरी करणाऱ्या  एका आरोपीचा पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. शिरसाट यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

ठळक मुद्देअटकपूर्व जामीन फेटाळला

आॅनलाईन लोकमतनागपूर : वाहन कर्जाच्या नावे फसवेगिरी करणाऱ्या  एका आरोपीचा पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. शिरसाट यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.आरोपी मोहम्मद साजीद मोहम्मद रफिक शेख (३४)रा. आम्रपाली अपार्टमेन्ट खसाळा रोड, असे आरोपीचे नाव आहे.प्रकरण असे की मोहम्मद साजीद, मोहम्मद रफिक नूर मोहम्मद शेख, राजेश प्रभाकर चव्हाण, माधव सुभाष बाबळसरे, चंपालाल ऊर्फ चंदूलाल प्रेमलाल शाहू , विजय गुरुप्रसाद पटेल, तुषार रमेश पाटणे आणि इतरांनी आपसात संगनमत करून थापरसन्स मोटर्स आणि स्टार मोटर्स यानावाने बँक आॅफ महाराष्टÑ आणि बँक आॅफ बडोदा या ठिकाणी बनावट खाते उघडले होते. या दोन्ही फर्मचे प्रोप्रायटर बाबळसरे याला दाखवण्यात आले होते.२७ नोव्हेंबर २०१४ ते २१ जून २०१७ या काळात वाडी शाखेच्या विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत वाहन कर्जासाठी बनावट कागदपत्रे संलग्न करून अर्ज सादर करण्यात आले होते. या बँकेने मोहम्मद रफीक आणि मोहम्मद साजीद यांच्या संयुक्त नावे १० लाख ६५ हजार आणि राजेश चव्हाण याच्या नावे ६ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते.या टोळीने हे चेक थापरसन्स आणि स्टार मोटर्सच्या नावे उघडलेल्या बनावट खात्यात जमा करून ही रक्कम परस्पर काढून घेऊन बँकेची फसवणूक केली.विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक सचिन आबाजी देवतळे यांच्या तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात २१ जून २०१७ रोजी भादंविच्या ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० ब, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपवण्यात आले असता चंपालाल शाहू, विजय पटेल, राजेश चव्हाण, मोहम्मद रफिक यांना अटक करण्यात आली होती. इतर आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत. त्यापैकी मोहम्मद साजीद याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील लीलाधर घाडगे यांनी काम पाहिले.