लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोव्हिड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिड-19 हे अॅप (with the support of HLL Life Care GoI) अॅप तयार करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करुन सदर अॅप डाऊनलोड करावा.अॅप डाऊनलोड केल्या नंतर त्यामध्ये स्वत:च्या आजाराविषयी माहिती भरावी. संपूर्ण माहिती भरल्यावर सबमिट बटनवर क्लिक करावे.सदर भरलेल्या माहितीच्या आधारे कोव्हिड-१९ ची लक्षणे असल्यास मनपा च्या डॉक्टरांना कळेल. त्या माहितीच्या आधारे मनपाचे डॉक्टर आपल्याशी संपर्क करुन पुढील कार्यवाही करतील.कृपया खाली दिलेली लिंक क्लिक करा आणि 'कोव्हिडं-19' अॅप डाउनलोड करा.
https://drive.google.com/file/d/1abB97jEnkrzvIzcOY0eebr_wcQ8tT_sJ/view?usp=drivesdk
इशारा : सदर अँप फक्त कोव्हिड- १९ चे लक्षणे जसे ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास असणा-या नागरिकांसाठी आहे. इतरांनी सदर अँपचा वापर करु नये.