लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती वेळोवेळी नगरसेवकांना भेटत नाही. मनपा प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वयचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना सामोरे जाताना नगरसेवकांसमोर अडचणी येत आहेत. तरी यापुढे कोव्हिड-१९ चा मुकाबला करताना प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवण्यात यावा, असे निर्देश महापौरसंदीप जोशी यांनी गुरुवारी दिले.कोव्हिड-१९ संदर्भातील नागपूर शहरातील सद्यस्थितीवर मनपा मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जोशी यांच्यासह नगरसेवक व आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समितीचे सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह सर्वच पक्षाचे गटनेते उपिस्थत होते.यावेळी प्रवीण दटके यांनी प्रशासनाच्या निर्णयांवर रोष व्यक्त केला. विलगीकरण केंद्रात देण्यात येणाºया भोजनाविषयी अनेक तक्रारी होत्या. लोकांना जर विलगीकरण केंद्रात चांगल्या सोयी दिल्या तर लोक स्वत:हून विलगीकरण केंद्रात येण्यास तयार झाले असते, असे ते म्हणाले. यावर आयुक्त मुंढे म्हणाले, जे काही निर्णय झाले ते जनतेच्या हितासाठी आणि शासनाच्या वेळोवेळी आलेल्या दिशानिर्देशानुसारच घेण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राचे निर्णय हे शासनाच्या दिशानिर्देशानुसारच घेण्यात आले आहेत. नागरिकांना हॉटस्पॉटमधून विलगीकरण केल्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करता आली. शासनाकडून जो निधी यासाठी आला त्याचा वापर दिशानिर्देशानुसारच करण्यात आला. इतर जो निधी खर्च करणे आवश्यक होते तो मनपाच्या लेखाशीर्षातून आवश्यकतेनुसार खर्च करण्यात आला. यापुढे प्रत्येक निर्णयाची माहिती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.संदीप जोशी यांनी सांगितले की नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी असून त्यांना सोबत घ्यायला पाहिजे. त्यामुळे प्रशासन जे काही करते, त्याची माहिती नगरसेवकांना व्हायलाच हवी. गेल्या दोन महिन्याच्या काळात महापौरांसह कुणालाही मनपा प्रशासनाने माहिती दिली नाही. त्यामुळे यापुढे प्रत्येक नगरसेवकांना विश्वासात घेऊन कामे करावी. पदाधिकारी आणि प्रशासन मिळून कोरोनाला हद्दपार करु, असेही ते म्हणाले.नगरसेवकांना माहिती नसल्याने संभ्रमयावेळी तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, शिवसेना गट नेते किशोर कुमेरिया, राकाँचे गटनेता दुनेश्वर पेठे आदींनी प्रशासन नगरसेवकांसोबत समन्वयाने वागत नसल्याची तक्रार केली. प्रशासन जे काही निर्णय घेत होते, त्याबद्दल नगरसेवकांना माहिती नसल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. नगरसेवकही आपल्या परीने नागरिकांसाठी सेवाकार्य करीत होते. मनपाने नगरसेवकांना सोबत घेतले असते तर नागपूर मनपा तर्फे कोविड काळात करण्यात आलेले कार्य अधिक प्रभावीपणे झाले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.निधी वापरण्यास अनुमती द्यापावसाळा तोंडावर आहे, त्यामुळे पावसाळी नाल्या, गटरलाईन व अन्य महत्त्वाची पावसाळापूर्व कामे करण्यासाठी नगरसेवकांचा निधी वापरण्यास अनुमती देण्याचे निर्देशही संदीप जोशी यांनी दिले. आतापर्यंत प्रशासनाने घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रत महापौर कार्यालयाला पाठवावी. गांधीनगर रुग्णालयाची माहिती तीन दिवसात सादर करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
कोव्हिड-१९ : मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधीमध्ये समन्वय ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 10:30 PM