शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Corona Virus in Nagpur; नागपुरातील फार्मा युनिटमध्ये कोविड-१९ चे औषध; ‘फ्लाविपिरॅव्हिर’वर चाचण्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 8:58 AM

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील फार्मास्युटिकल युनिट इन्व्हेंटिस रिसर्च कंपनी प्रा.लि. या कंपनीत प्राणघातक कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी औषध म्हणून ‘फ्लाविपिरॅव्हिर’ या नावाच्या जपानी औषधावर क्लिनिकल चाचण्या घेण्यात येत आहेत.

ठळक मुद्देइन्व्हेंटिस रिसर्च कंपनी

सोपान पांढरीपांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील फार्मास्युटिकल युनिट इन्व्हेंटिस रिसर्च कंपनी प्रा.लि. या कंपनीत प्राणघातक कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी औषध म्हणून ‘फ्लाविपिरॅव्हिर’ या नावाच्या जपानी औषधावर क्लिनिकल चाचण्या घेण्यात येत आहेत.इन्व्हेंटिस रिसर्चचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक बी. बिरेवार यांनी गुरुवारी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली. मूळचे हे औषध जपानच्या फुजी केमिकल इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेडने तयार केले आहे आणि अनेक प्रकारच्या ‘एन्फ्लुएन्झा’ प्रकारच्या आजारांवर प्रभावी असल्याचे डॉ. बिरेवार यांनी सांगितले. व्यावसायिक कारणासाठी कंपनीला या चाचण्या आयोजित करण्यासाठी फुजी केमिकल इंडस्ट्रीजची परवानगी मिळाली नाही. पण जर आम्ही चाचण्यात यशस्वी ठरलो तर आपोआपच परवानगी मिळेल, असे डॉ. बिरेवार यांनी आत्मविश्वासाने सांगितले.‘फ्लाविपिरॅव्हिर’ एक सक्रिय फार्मास्युटिकल घटक (एपीआय) किंवा बल्क ड्रग फुजी केमिकल इंडस्ट्रीजने विकसित केले आहे. कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी मानले जाणारे जगप्रसिद्ध औषध ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ तयार करण्याचा कंपनी ‘फ्लाविपिरॅव्हिर’ सोबत प्रयत्न करीत आहे. भारतामध्ये दररोज २० ते ३० लाख गोळ्या ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ तयार करण्याची क्षमता आहे, पण सध्याच्या परिस्थितीत ही क्षमता कमी पडत आहे. बिरेवार म्हणाले, सरकारने ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ औषधावरील निर्यात बंदीदेखील काढून टाकली आहे. त्यामुळे या औषधाची निर्यात क्षमता वाढली आहे. आम्ही जवळपास एका महिन्यात ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ आणि पुढील अडीच महिन्यात ‘फ्लाविपिरॅव्हिर’ विकसित करण्याची योजना आखली आहे, असेही ते आत्मविश्वासाने म्हणाले.इन्व्हेंटिस रिसर्च ही चंद्रपूर आधारित मल्टी आॅर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी असून सन १९७६ मध्ये बाबूराव व्ही. बिरेवार यांनी स्थापन केली. कंपनी अजूनही शेती, फार्मास्युटिकल्स, औषधे, प्लास्टिक आणि इतर अनेक क्षेत्रांसाठी आवश्यक औषधे आणि सेंद्रीय रसायने तयार करते. इन्व्हेंटिस कंपनीची स्थापना डॉ. दीपक बिरेवार यांनी सन २०१४ मध्ये केली होती आणि कंपनीचे कामकाज संपूर्ण भारतात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढालीने सुरू आहे. कंपनीने २०१५ मध्ये फार्मा स्टार्टअपचा ईटी पुरस्कारही जिंकला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या