लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग तोंड आणि नाकाप्रमाणेच डोळ्यांमधूनही होतो. ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास यासह डोळे येणे हे सुद्धा कोविडचे एक लक्षण आहे. याशिवाय ‘वर्क फ्रॉम होम’मुळेही डोळ्यांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या, असा सल्ला नेत्र शल्यचिकित्सक तथा ग्रीन सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राफत खान आणि नेत्रतज्ज्ज्ञ तथा नियाक्षी आय हॉस्पिटलचे डॉ. विरल शाह यांनी दिला. मनपा आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोविड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात बुधवारी त्यांनी कोविड आणि डोळ्यांची निगा या विषयावर मार्गदर्शन केले.डोळ्यांमधून होणारा संसर्ग हा नाक आणि तोंडातून होणाऱ्या संसर्गाएवढाच घातक आहे. डोळ्यांना वारंवार हात लावणे टाळा. कोविड संकटात शक्य असल्यास कॉन्टॅक्ट लेन्स टाळा आणि चष्मा वापरा. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा, असे आवाहन यावेळी राफत खान आणि विरल शाह यांनी केले.२०-२०-२० चे सूत्र अंगीकाराएकटक मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहत असल्याने डोळ्यांमध्ये ओलावा ठेवणारा अश्रूंचा थर कमीकमी होत जातो. त्यामुळे अनेक त्रास सुरू होतात. यावर उपाय म्हणून २०-२०-२०चे सूत्र अंगीकारा. मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहत असताना किंवा त्यावर काम करत असताना प्रत्येक २० मिनिटांनी २० सेकंदांचा ब्रेक घ्या, या ब्रेकमध्ये किमान २० मीटर दूरपर्यंत पाहा, आकाश, झाडे, खिडकीबाहेरचा परिसर पाहा, पापण्यांची उघडझाप करा, असेही त्यांनी सांगितले.
कोविडचा डोळ्यातूनही संसर्ग : डोळ्यांची विशेष काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 9:11 PM
कोविड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग तोंड आणि नाकाप्रमाणेच डोळ्यांमधूनही होतो. ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास यासह डोळे येणे हे सुद्धा कोविडचे एक लक्षण आहे. याशिवाय ‘वर्क फ्रॉम होम’मुळेही डोळ्यांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत.
ठळक मुद्देडॉ. राफत खान आणि डॉ. विरल शाह यांचा सल्ला