मनपातर्फे नागरिकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोस, दुसरा डोस घेण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल, ही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. तसेच ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्ष व ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोविशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली. तसेच १८ वर्षांवरील व ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कामठी रोड व स्व. प्रभाकर दटके म.न.पा. महाल रोगनिदान केंद्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामबाडा, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय, पाचपावली, प्रगती हाॅल, दिघोरी आणि आयुष रुग्णालय, सदर येथे उपलब्ध आहे.
आज कोविशिल्ड उपलब्ध, १५ ऑगस्टला लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:11 AM