शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Corona Virus in Nagpur; नाकाबंदी करीत उपराजधानीत ‘सीपी’ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 9:13 PM

पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी शहरातील सीमावर्ती भागातील नाकाबंदी पॉर्इंटला भेट देऊन पाहणी केली आणि कडक बंदोबस्ताच्या सूचना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील काही भागात गस्त वाढविली आहे. बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी सीमावर्ती भागातही पहारा वाढविला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी शहरातील सीमावर्ती भागातील नाकाबंदी पॉर्इंटला भेट देऊन पाहणी केली आणि कडक बंदोबस्ताच्या सूचना केल्या.सोमवारी नागपुरात एकाच दिवशी कोरोनाचे तीन रुग्ण नव्याने उघडकीस आल्याने आणि सतरंजीपुरा भागातील रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाने आता विशेष दक्षता घेणे सुरू केले आहे. लॉकडाऊन झाल्यापासूनच शहरातील सर्व चौकांमध्ये आणि सीमावर्ती भागातील मार्गावरील सर्व मुख्य पोलिसांचा २४ तास पहारा आहे. कोरोनाचा प्रकोप वाढू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. पोलीस विभागानेही कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गरीब नागरिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेचे नियोजन सामाजिक संघटनांच्या माध्यमतून केले आहे.दरम्यान, सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपाध्याय यांनी मंगळवारी दुपारी काटोल रोड, कामठी नाका परिसरातील नाकाबंदी पॉर्इंटला भेट देऊन पहाणी केली. स्वत: चौकात उभे राहून बंदोबस्ताचा आढावाही घेतला. बंदोबस्तावरील पोलिसांना आवश्यक त्या सूचना देऊन त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी व्हेरायटी चौक, सीताबर्डी चौकात जाऊन पहाणी केली. शहरातील मुख्य चौक असलेल्या बहुतेक ठिकाणी उपाध्याय यांनी आज भेटी दिल्या आणि आढावा घेऊन त्यातील त्रुटी जाणून घेतल्या.दरम्यान, वाठोडा येथे मंगळवारी दुपारनंतर पोलिसांनी पथसंचालन केले. लॉकडाऊन सुरू असल्याने आणि संचारबंदी कायम असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना यावेळी पोलिसांनी परिसरातील नागरिकांना ध्वनिक्षेपकावरून केल्या. सतरंजीपुरा भागातही गस्त आणि पहारा वाढविला आहे. या परिसरातील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने महानगरपालिका, पोलीस विभाग आणि प्रशासनाच्यावतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. या परिसरातील नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले.शहरातील काही भागात दोन दिवसापासूनच पोलिसांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नाकाबंदी केली आहे. मंगळवारीही ती कायम होती. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी शहरात फिरून या सर्व परिस्थितीची पहाणी केली, काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना दिल्या.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस