शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

यंदाची नागपुरातील फटाक्यांची दिवाळी १०० कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 9:17 PM

दिवाळीतील उत्सवी वातावरणाला झळाळून सोडणारे फटाके यंदा महागाईनंतरही मोठ्या प्रमाणात वाजले. कच्च्या मालाच्या कि मतीत वाढ, कामगारांची टंचाई आणि वाढलेली मजुरी, वीज दरवाढ, डिझेलमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च आदींमुळे यावर्षी फटाके १५ ते २० टक्क्यांनी वधारले. त्यानंतरही नागपुरात विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली. यंदा नागपूर जिल्ह्यात फटाक्यांची दिवाळी १०० कोटींची झाल्याचा अंदाज घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्दे१५ ते २० टक्के महाग : ग्राहकांची उत्साहात खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीतील उत्सवी वातावरणाला झळाळून सोडणारे फटाके यंदा महागाईनंतरही मोठ्या प्रमाणात वाजले. कच्च्या मालाच्या कि मतीत वाढ, कामगारांची टंचाई आणि वाढलेली मजुरी, वीज दरवाढ, डिझेलमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च आदींमुळे यावर्षी फटाके १५ ते २० टक्क्यांनी वधारले. त्यानंतरही नागपुरात विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली. यंदा नागपूर जिल्ह्यात फटाक्यांची दिवाळी १०० कोटींची झाल्याचा अंदाज घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.विक्रेत्यांना परवाना मिळण्यास उशीरपर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे फटाका विक्रीत घट होण्याची शक्यता प्रारंभी वर्तविली जात होती. दिवाळीच्या पाच दिवसांपूर्वी ग्राहक बाजारात फिरकले नव्हते. पण लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवसांपूर्वी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. पोलिसांनीही दिवाळीच्या काहीच दिवसांपूर्वी फटाके विक्रीला परवाना दिल्यामुळे अनेकांना दुकाने थाटण्यात अडचणी आल्या. किरकोळ विक्रेत्यांना परवाना मिळाल्यानंतरच ठोक खरेदीला प्रारंभ केला. रेशीमबाग, तुळशीबाग येथील फटाके विक्रेते सय्यदभाई म्हणाले, परवाना उशिरा मिळाला तरीही फटाके विक्रीवर काहीही परिणाम झाला नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांनी उत्साहात खरेदी केली.कच्चा माल महागलाफटाके निर्मितीसाठी बेरियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, अल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्चा मालाचा वापर केला जातो. यंदा यापैकी अनेक गोष्टीच्या कि मतीमध्ये लक्षणीय अशी वाढ झाली. शिवाय कामगारांची वाढलेली मजुरी तसेच डिझेल-पेट्रोलच्या किमतीतील सततच्या वाढीमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च या सर्व बाबींमुळे फटाके उत्पादकांना फटाक्यांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता, असे उत्पादक ललित कारटवटकर यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अन् पर्यावरण प्रेमींची जनजागृतीवाढत्या प्रदूषणाचे कारण देत रात्री दहानंतर फटाके वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा मनाई आदेश आणि पर्यावरण प्रेमींच्या जनजागृतीचा परिणाम विक्रीवर झाल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. फटाक्यांमध्ये अनार, सुतळी बॉम्ब, चक्री, फुलझडी यांची सर्वाधिक विक्री होते. यंदा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांऐवजी नागरिकांनी फॅन्सी, विना आवाजाचे, रंगांची उधळण करणाऱ्या कमी आवाजाच्या फटाक्यांना प्राधान्य दिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांपासून उत्पादक कंपन्यांनी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचे उत्पादन कमी केले आहे. फटाक्यांवर देवीदेवतांची चित्रेही वापरणे या कंपन्यांनी बंद केले आहे. एकंदरीत न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि नागरिकांमध्ये झालेली जागृती यामुळे फटाक्यांच्या विक्रीत पुढे आणखी वाढ होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :DiwaliदिवाळीCrackersफटाके