शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

क्रेझी कॅसल मृत्यू प्रकरण : नष्ट करण्यात आले सीसीटीव्ही फुटेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:09 PM

दोन हुशार विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या वॉटर पार्क क्रेझी कॅसल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अपघाताचे फुटेज नष्ट करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. ‘डीव्हीआर’ ची तपासणी केली असता त्यात गेल्या चार महिन्याचे फुटेज गायब असल्याचे आढळून आले आहे. यामुळे बजाजनगर पोलीसातही खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देडीव्हीआरमधून चार महिन्याचा ‘डाटा’ गायब : षडयंत्राचा पोलिसांना संशय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन हुशार विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या वॉटर पार्क क्रेझी कॅसल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अपघाताचे फुटेज नष्ट करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. ‘डीव्हीआर’ ची तपासणी केली असता त्यात गेल्या चार महिन्याचे फुटेज गायब असल्याचे आढळून आले आहे. यामुळे बजाजनगर पोलीसातही खळबळ उडाली आहे.रविवारी दुपारी क्रेजी केसलमध्ये डुबल्याने अक्षय अनिल बिंड (१९) रा. चितार ओळी इतवारी आणि सागर गंगाधर सहस्त्रबुद्धे (२२) रा. लुंबीनीनगर जरीपटका यांचा मृत्यू झाला होता. तर स्नेहल प्रकाश मोटघरे (२१) रा. भीम चौक, जरीपटका हा जखमी झाला होता. अक्षयचे चार इतर मित्र आणि एका महिलेला डुबण्यापासून वाचवण्यात आले. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने ‘वॉटर पार्क ’ बंद केले आहे. घटनास्थळी उपस्थितच बाऊंसर व सुरक्षा कर्मचाºयांनी मुलांची कुठलीही मदत केली नाही. त्यांना रुग्णालयात पोहोचवण्याचीही व्यवस्था केली नाही. क्रेझी कॅसलच्या निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड रोष आहे. बजाजनगर पोलिसांनी रविवारी सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला होता. पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.सूत्रांनुसार बजाजनगर पोलिसांनी सोमवारी तज्ज्ञांच्या मदतीने डीव्हीआरची तपासणी केली. यानंतर २० जानेवारीनंतर त्यात कुठलीही रेकॉर्डिंग ‘स्टोर’ नसल्याचे आढळून आले. यानंतर क्रेझी कॅसलमध्ये सीसीटीव्हीची देखरेख करणाऱ्या दिनेश जगदाळे याची विचारपूस करण्यात आली. परंतु तो कुठलेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे या प्रकरणात आता नवीनच पेच आला आहे.क्रेझी कॅसलची जमीन मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. नुकतीच क्रेझी कॅसलची लीजही रद्द करण्यात आली आहे. ताजा घटनेनंतर लीज रद्द करण्यात आल्याची बाब उघडकीस आल्यानंतर सीसीटीव्हीचे फुटेज नष्ट करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. ताजा घटनेत प्रत्यक्षदर्शी अक्षयचे मित्रांनतर सीसीटीव्हीचे फुटेज हेच क्रेझी कॅसलच्या संचालकांविरुद्ध ठोस पुरावे म्हणून सादर करता आले असते. परंतु ते गायब झाल्याने पुरावे नष्ट करण्यात आल्याची शंका नाकारता येत नाही. पोलीसही याच दिशेने तपास करीत आहेत.पोलिसांनी सोमवारी क्रेझी कॅसलचे अधिकारी आणि लाईफ गार्डची विचारपूस केली. लाईफ गार्डचे म्हणणे होते की रविवारी पाच लोकांची ड्युटी करण्यात आली होती. ज्या पूलमध्ये विद्यार्थी बुडाले. तिथे दोन गार्ड तैनात होते. त्यांनी या घटनेपूर्वीच एका जोडप्याला डुबण्यापासून वाचवले होते. जोडप्याला वाचवल्यानंतरही धोका लक्षात आला नाही का? या प्रश्नाचे मात्र लाईफ गार्डकडे कुठलेही उत्तर नव्हते. तसेच विद्यार्थ्यांच्या मित्रांनी विनंती केल्यानंतरही कृत्रिम लाटांना बंद का करण्यात आले नाही? याचेही उत्तर लाईफ गार्ड आणि क्रेझी कॅसलमध्ये तनात इतर कर्मचाºयांकडे नाही.अक्षय आणि सागरचे सोमवारी सकाळी मेडिकलमध्ये पोस्टमार्टम करण्यात आले. पोलिसांनी डॉक्टरांना प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्ट देण्याची विनंती केली आहे. ती मंगळवारी मिळणार आहे. या आधारावर पोलीस पुढील कारवाई करणार आहे.अक्षयचे कुटुंबीय ठाण्यात पोहोचलेसीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची माहिती मिळताच अक्षय बिंडचे कुटुंबीय हादरले आहेत. सोमवारी अक्षयची आई अनिता, मावशी मोणिका वयानी, बहीण पूजा आणि मावस बहीण श्रद्धा एका तज्ज्ञासोबत बजाजनगर पोलीस ठाण्यात पाहोचले. त्यांनीही सीसीटीव्ही आणि डीव्हीआरची तपासणी केली. घटनेचे फुटेज नसल्याचे आढळून आल्याने त्यांना धक्काच बसला. सूत्रानुसार डीव्हीआरसंबंधात पोलीस एका विशेष तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेणार आहे.कंपनीच्या संचालकांची मागितली माहितीक्रेझी कॅसलचे संचालन हल्दीराम फुड इंटरनॅशनल लि. कंपनी करते. पोलिसांनी कंपनीचे संचालक आणि अधिकाºयांची माहिती मागितली आहे. ती मिळाल्यानंतरची त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. क्रेझी कॅसलच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून येताच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे निश्चित केले आहे.११ लोकांना विचारपूसबजाजनगर पोलिसांनी सोमवारी ११ लोकांची विचारपूस केली. यात एचआर मिलिंद बोबडे, वॉटर कुल मॅनेजर राजेश बडवाईक, सीसीटीव्ही प्रभारी दिनेश जगदाळे, परिचारिका सविता हातमोडे, रेवती हिरणखेडे आणि लाईफ गार्ड यांचा समावेश आहे. मंगळवारी इतर लोकांचीही विचारपूस करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास बजाजनगरचे ठाणेदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.क्रे झी कॅसलवर गुन्हा दाखल कराअंबाझरी येथील क्रेझी कॅसल वॉटर पार्कच्या कृत्रिम लाटा निर्माण करणाऱ्या पुलात अक्षय बिंड व सागर सहस्रबुद्धे या तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात क्रेझी कॅसल व्यवस्थापनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत, अक्षयच्या नातेवाईकांसह त्याच्या आप्तस्वकीयांनी क्रेझी कॅसलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आज अक्षयची अंत्ययात्रा काढण्यात आली. इतवारीतील गांधी चौकात व महालातील बडकस चौकात त्याचे पार्थिव ठेवून क्रेझी कॅसलविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. अक्षयच्या घरचे वातावरण अतिशय भावुक झाले होते. अक्षयच्या दुर्दैवी जाण्याची हळहळ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. मोठ्या संख्येने अंत्ययात्रेला जमलेल्या लोकांनी या दुर्दैवी घटनेचा निषेध करीत, क्रेझी केसल वॉटर पार्कच्या मालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. अक्षयच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

टॅग्स :Deathमृत्यूCrimeगुन्हा