आयटीआय संघटनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी : जानेवारीत चर्चेचे आश्वासननागपूर : महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दिले. मागण्यांवर विशेष लक्ष देऊन त्या सोडविण्याचे आश्वासन मंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.बैठकीत आ. अनिल सोले, आ. नागो गाणार यांच्या उपस्थितीत संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत देसले, सरचिटणीस भोजराज काळे, संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष नंदकुमार शेंद्रे, नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश मामुलकर यांनी मंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. नव्याने सुधारित सेवाप्रवेश नियम तयार करावे, आयटीआयमधील कंत्राटी निदेशकांना रिक्त असलेल्या पदावर समायोजन करावे, शिक्षकीय पदधारकांना १०० टक्के निवडश्रेणी लागू करावी, प्रशिक्षणात सुधारणा करावी आदी मुख्य मागण्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांसमोर मांडल्या. याशिवाय अन्य मागण्यांवर सकारात्मक चर्चा करताना मंत्र्यांनी या विषयावर जानेवारीत मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. चर्चेदरम्यान संघटनेचे उपाध्यक्ष आबा माळी, कोषाध्यक्ष टी.एन. पाटील, सचिव विनोद दुर्गपुरोहित, सदस्य विजय सातव, विभागीय उपाध्यक्ष शिवाजी ढुमणे, सदस्य अनिल जीभकाटे, विभागीय कोषाध्यक्ष विनोद पोटे आणि सहसचिव जी.एन. पैडलवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सुधारित सेवाप्रवेश नियम तयार करा
By admin | Published: December 30, 2014 12:57 AM