‘भारत बंद’साठी रणनीती तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 01:22 AM2018-09-09T01:22:25+5:302018-09-09T01:23:12+5:30
राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. याबाबत शहर काँग्रेसने शनिवारी बैठक घेतली. सविस्तर चर्चा केल्यानंतर बंद यशस्वी करण्यासाठी रणनीती आखली आहे. या रणनीतीनुसार शहरातील चौकाचौकात निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. याबाबत शहर काँग्रेसने शनिवारी बैठक घेतली. सविस्तर चर्चा केल्यानंतर बंद यशस्वी करण्यासाठी रणनीती आखली आहे. या रणनीतीनुसार शहरातील चौकाचौकात निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, सचिव उमाकांत अग्निहोत्री, संजय महाकाळकर, विशाल मुत्तेमवार, अॅड. अभिजित वंजारी आदी उपस्थित होते. यावेळी विकास ठाकरे यांनी सांगितले की, काँग्रेसच्या कार्यकाळात कच्च्या तेलाच्या किमती अधिक होत्या. यानंतरही आजच्या तुलनेत पेट्रोल-डिझेले मूल्य ४० टक्के कमी होते. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे बेहाल झाले आहेत. सध्या कच्च्या तेलाच्या किमती कमी आहेत तरीही केंद्रातील मोदी सरकार याचा लाभ लोकांपर्यंत न पोहोचविता त्यांच्यावर टॅक्स भार लादत आहे. नागरिकांचे बजेट बिघडले आहे. तेव्हा या बैठकीत शहरातील सर्व ६ विधानसभा क्षेत्रातील १८ ब्लॉक अध्यक्षांमार्फत शहरात विविध चौकांमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संचालन डॉ. गजराज हटेवार यांनी केले. संदेश सिंगलकर यांनी आभार मानले. बैठकीत प्रा. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, जयंत लुटे, रमण पैगवार, नगरसेवक रमेश पुणेकर, नितीन साठवणे, नितीश ग्वालवंशी, दर्शनी धवड, माजी आमदार यशवंत बाजीराव, राजेश नंदनकर, शिल्पा बोडखे, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, दयाल जशनानी, नरेश सिरमवार, अरविंद वानखेडे, मंगेश कामुने, अब्दुल शकील, सुनील दहीकर, फिरोज खान, मालिनी खोब्रागडे, प्रवीण आगरे, अॅड. अक्षय समर्थ, बॉबी दहीवले, धरम पाटील, रामगोविंद खोब्रागडे, वासुदेव ढोके, योगेश देवतळे, राजेश कुंभलकर, चंद्रकांत हिंगे, प्रसन्ना जिचकार, इरशाद अली, मोंटी गंडेचा, रवी गाडगे पाटील आदी उपस्थित होते.
इतर पक्षांचाही मिळाला पाठिंबा
काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला समाजवादी पार्टीने समर्थन दिले आहे. पक्षाचे विदर्भ प्रमुख अफजल फारुक यांनी सांगितले आहे की, देशातील नागरिक दरवाढीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे पक्ष या बंदचे समर्थन करते. पक्षाचे कार्यकर्ते शांततेने आंदोलन करतील.