शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

दबदबा निर्माण करण्यासाठी नागपुरात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:20 PM

खरबी परिसरात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी क्षुल्लक वादातून गुन्हेगार विशाल गजभिये याने साथीदाराच्या मदतीने एका युवकाचा खून केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देराहुल खुबाळकर हत्या प्रकरण : लोकांमध्ये तीव्र असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरबी परिसरात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी क्षुल्लक वादातून गुन्हेगार विशाल गजभिये याने साथीदाराच्या मदतीने एका युवकाचा खून केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विशाल विनायक गजभिये (२४) त्याचा साथीदार शंटू गोपाल शील (२१) आणि साहील ऊर्फ शुभम दिलीप रायकवार (२२) याला अटक केली आहे.मंगळवारी रात्री आरोपींनी खरबी येथील जय जलाराम नगर चौक येथे २४ वर्षीय राहुल शंकर खुबाळकर याची हत्या केली. राहुलच्या हत्येचे कारण हे १३ जानेवारी रोजी झालेला क्षुल्लक अपघात आहे. १३ जानेवारी रोजी सायंकाळी राहुलचा लहान भाऊ अमित बाईकने जात होता. वस्तीतील शुभम नावाच्या युवकाच्या वाहनाशी त्याच्या बाईकची धडक झाली. यात अमितला मार बसला. मेडिकलला नेल्यावर त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे समजले. विशाल आणि त्याचे साथीदार परिसरात चायनीज ठेला लावतात. विशाल गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे.विशाल राहुलला त्याच्या भावाचा उपचार करणे, प्रकरण रफा-दफा करणे आणि शुभमच्या वाहनाचे झालेले नुकसानभरपाईच्या नावावर ४६ हजार रुपये मागू लागला. राहुलने त्याला पैसे देण्यास नकार दिला. राहुलच्या उत्तराने विशाल संतापला. त्याने राहुलला अद्दल घडवण्याचे ठरवले. राहुलला धडा शिकवून त्याला परिसरात आपला दबदबा निर्माण करायचा होता. घटनेच्यावेळी रात्री ९ वाजता राहुल त्याचा भाऊ राजेशसोबत जय जलाराम चौकात आला होता. विशालने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. राहुलच्या हत्येने परिसरात दहशत पसरली. नागरिक प्रचंड संतापले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, परिसरात आरोपींचा चायनीज ठेला आहे. तेथे नेहमीच असामाजिक तत्त्वांचा वावर असतो.भावासमोरच केला खूनआरोपींनी राहुलचा खून त्याचा लहान भाऊ राजेशसमोरच केला. राजेशने भावाला वाचवण्यासाठी आरोपींना थांबवण्याचा प्रयत्नही केला. आरोपी ऐकायला तयार नव्हते. या घटनेने राजेश प्रचंड धास्तावलेला आहे. राहुल पाण्याची कॅन डिलिवरी करण्याचे काम करीत होता. तो सर्वांशीच चांगला वागत असल्याने या घटनेमुळे परिसरातील नागरिक प्रचंड संतापले आहे.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून