लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आपली बस’च्या भाड्यात २५ टक्के वाढ केल्यानंतरही उत्पन्नात वाढ होताना दिसत नाही. दररोज १४ ते १७ लाखांचा महसूल जमा होत आहे. वास्तविक १६ ते १९ लाख वा त्याहून अधिक उत्पन्न होणे शक्य आहे. परंतु कंडक्टरांनी आपला व्हॉटस्अॅप ग्रुप बनविला असून, या माध्यमातून महापालिकेचा परिवहन विभाग, परिवहन सभापती व डिम्ट्सच्या अधिकाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. वास्तविक ड्युटीवर असताना मोबाईल बाळगण्याला मनाई आहे. यासंदर्भात डिम्ट्सने पोलिसात तक्रार केली आहे. मात्र पोलिसांनी कारवाई करण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे.परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे भरारी पथक गठित करून बसची आकस्मिक तपासणी सुरू केली होती. या कारवाईदरम्यान कंडक्टरांचे मोबाईल मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले होते. त्यावेळी व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून भरारी पथकाच्या लोकेशनची गु्रपच्या माध्यमातून एकमेकांना माहिती देत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे ग्रुपमधील अनेक कंडक्टरांना कामावरून कमी केले होते. नोव्हेंबर महिन्यातील उत्पन्न १७ ते १९ लाखापर्यंत पोहचले होते. वास्तविक महापालिकेने २२ जानेवारी २०१९ पासून तिकिटाच्या दरात वाढ केली आहे. त्यानंतरही महिन्याचे उत्पन्न १३ ते १७ लाखांच्या दरम्यान आहे. उत्पन्नात वाढ होत नसल्याबाबत परिवहन व्यवस्थापकांनी डिम्ट्सकडे तक्रार केली. त्यानंतर चौकशीत व्हॉटस्अॅप ग्रुप बनवून तिकिटाच्या पैशाचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आले होते.परिवहन समितीने गठित के लेल्या भरारी पथकाने २० मोबाईल जप्त केले होते. यातील अनेक कंडक्टर मोबाईल परत मागण्यासाठी आलेले नाहीत. व्हॉटस्अॅप ग्रुप बनवून कंडक्टर महापालिकेला लाखोंचा चुना लावत आहेत. परिवहन विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. डिम्ट्सने नियुक्त केलेल्या तिकीट तपासनिसांची भूमिका संशयास्पद आहे. मोबाईल बाळगणे व व्हॉटस्अॅप ग्रुप बनवूनमहापालिके चे आर्थिक नुकसान होत असूनही कारवाई करण्यासंदर्भात पोलीस उत्सुक नाहीत. परिवहन विभागाने आपल्या स्तरावर कारवाई करावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दुसरीकडे तिकिटाच्या पैशाचा काळाबाजार निदर्शनास आल्यानंतरही महापालिका प्रशासनाला ग्रुप नेस्तनाबूत करण्यात यश आलेले नाही.पोलिसांनी हात वर केलेडिम्ट्सने कळमेश्वर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून कंडक्टर विलास लक्ष्मण कुंभारे यांनी व्हॉटस्अॅपग्रुप बनवून बसचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार केली होती. तक्रारीत म्हटले आहे की, २९ एप्रिलला ब्राम्हणी फाटा (कळमेश्वर) ते बर्डी मार्गावर विलास कुंभारे याने बस क्रमांक एमएच ३१ सीए ६०१० मध्ये होता. डिम्ट्सचे आगार व्यवस्थापक योगेश नवघरे, सहकारी सतीश सदावर्ते, योगेश ठाक रे, रोशन पहाडे आदींनी बसची तपासणी केली. त्यावेळी कुंभारे याच्याकडे मोबाईल आढळून आला. व्हॉटस्अॅप ग्रुप निदर्शनास आला, तिकीट तपासनिसांनी जे लोकेशन दिले होते त्या ग्रुपमध्ये असलेल्या क्रमांकाची तपासणी केली असता त्यातील बहुसंख्य क्रमांक बस कंडकटर व चालकांचे होते. पैसे घेतल्यानंतरही प्रवाशंना तिकीट दिले जात नाही. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते.एके-४७ , के के नावाचे ग्रुपजप्त करण्यात आलेल्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात दोन ग्रुप आढळून आले. एकाचे नाव एके-४७ तर दुसऱ्याचे केके असे होते. यातील बहुतेक मोबाईल क्रमांक कंडक्टर व चालकांचे होते. त्यात निरीक्षकांचे लोकेशन, परिवहन अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती देण्यात आली होती.नियमात बदल करण्याची गरजकंडक्टरांचे नेटवर्क नेस्तनाबूत करण्यासाठी प्रथम तिकीट तपासनिसांचे नेटवर्क तयार करावे लागेल. त्यानंतर आकस्मिक तपासणी मोहीम हाती घ्यावी लागेल. परिवहन समितीच्या प्रस्तावानुसार पथकात दररोज नवीन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. महापालिकेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवावी लागेल तरच या प्रकाराला आळा बसणे शक्य होईल, अशी माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.