मंजुरीप्राप्त परियोजनांनाच प्राधान्य : १९ ते २२ दरम्यान आयोजननागपूर : नागपुरातील नव्या ट्रेंडची माहिती ग्राहकांना व्हावी या उद्देशाने ‘क्रेडाई नागपूर मेट्रो’द्वारे ‘प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदा या ‘एक्स्पो’चे आयोजन १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती क्रेडाई-नागपूर मेट्रोचे अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी पत्रपरिषदेत दिली. क्रेडाई नागपूर मेट्रो ही शहराच्या मेट्रो रिजनमध्ये कार्यरत शहरातील बिल्डर्स व डेव्हलपर्सची संस्था आहे. संस्था राज्य स्तरावर क्रेडाई महाराष्ट्रशी व राष्ट्रीय स्तरावर क्रेडाई नॅशनलशी संलग्नित आहे. ग्राहकांना सुरक्षित घर मिळावे, हस्तांतराच्या वेळी कोणताही त्रास होणार नाही. घरासंदर्भातील सर्व प्रकारची कागदपत्रांमध्ये पारदर्शकता राहावी हा उद्देश ठेवून क्रेडाई नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. ग्राहकाची व्यवहारात कोणत्याच प्रकारची फसवणूक होता कामा नये याची विशेष दखल संस्थेकडून घेण्यात येते. व्यवहारात पारदर्शकतेच्या दृष्टीने ‘कोड आॅफ कंडक्ट’ बनवले आहे. ग्राहकांना चांगले सुविधायुक्त घर मिळवून देणे हा क्रेडाईचा मानस आहे. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यामातून सदस्य बिल्डर्स आपल्या योजना ग्राहकांसमोर सादर करणार आहेत. संस्थेचे सदस्य असलेल्या बिल्डर्सकडून त्याच्या परियोजना सर्व मंजुरीप्राप्त आहेत की नाही याची चौकशी केल्यावरच एक्स्पोसाठी स्टॉलची मान्यता संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मागील ४ वर्षापासून क्रेडाई या एक्स्पोचे आयोजन करीत असून यंदाचा हा पाचवा एक्सपो आहे. दरम्यानच्या काळात कोणत्याही ग्राहकाला प्रॉपर्टी विकली अथवा दिलेल्या वेळात अथवा सांगितल्याप्रमाणे समाधान झाले नाही याकरिता के्रडाईतर्फे तक्रार निवारण सेलची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या कोणत्याही सदस्याच्या विरुद्ध ग्राहकाला तक्रार करता येईल, असे के्रडाईचे अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी सांगीतले. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत या वेळात चार दिवस चालणाऱ्या एक्स्पोमध्ये विशेषत: फुडकोर्ट अथवा पर्याप्त फ्री पार्किंगची व्यवस्था केली आहे. प्रॉपर्टी विकत घेताना कोणकोणते निकष तपासले पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचे कार्य एक्स्पोमध्ये करत असते. पत्रपरिषदेत क्रेडाई नागपूर मेट्रोचे समन्वयक विशाल अग्रवाल, सचिव अनिल नायर, कोषाध्यक्ष गौरव अग्रवाल, सिद्धार्थ सराफ व सुनील दुद्धलवार उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)
‘क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो’ सप्टेंबरमध्ये
By admin | Published: August 03, 2014 1:00 AM