शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

सेवादलाच्या मानवंदनेत कृष्णकुमार पांडे यांच्यावर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 8:21 PM

राहुल गांधी, खरगेंचे प्रतिनिधी म्हणून आशिष दुआ अंत्यसंस्कारात सहभागी

नागपूर: भारत जोडो यात्रेत नांदेड येथे सहभागी झाले असता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झालेलेअ. भा. काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय संघटक कृष्णकुमार पांडे यांच्या पार्थिवावर बुधवारी वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ६५ वर्षांचे होते. प्रारंभी सेवादलातर्फे त्यांच्या निवासस्थानी मानवंदना देण्यात आली. काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण करीत कुठलीही अपेक्षा न करता पक्षासाठी झटणारा कर्मठ नेता गमावल्याची खंत व्यक्त केली.

मंगळवारी रात्री ९:३०च्या सुमारास पांडे यांचा मृतदेह नांदेडहून ॲम्ब्युलन्सद्वारे त्यांच्या मिलिंदनगर येथील निवासस्थानी आणण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी व राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या विशेष सूचनेनुसार अ. भा. काँग्रेसचे सचिव व विदर्भ प्रभारी आशिष दुआ हे मृतदेह घेऊन पोहचले. रात्रीपासून पांडे यांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सकाळी सेवादलातर्फे मानवंदना देण्यात आली. यानंतर वैशालीनगर घाट येथे अंंत्यसंस्कार करण्यात आले.

काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. यावेळी अ. भा. काँग्रेसचे विदर्भ प्रभारी आशिष दुआ, माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, सेवादलाचे राष्ट्रीय संघटक लालजी मिश्रा, मध्यप्रदेश सेवादलाचे अध्यक्ष, माजी आ. राजहंस सिंग, छत्तीसगडचे माजी आ. चंद्रकांत वाजपेयी यांच्यासह भाजप नेते आ. कृष्णा खोपडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, रिपाइं (आ.) चे भूपेश थूलकर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. पांडे यांच्या पश्चात वडील, पत्नी छायादेवी, मुलगा नीरज व शिलज, मुलगी रितू व मोठा आप्त परिवार आहे.

सव्वा वर्षात पिता-पुत्राचा मृत्यू- कृष्णकुमार पांडे यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा धीरज याचा सव्वा वर्षापूर्वी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता. धीरज युवक काँग्रेसमध्ये सक्रिय होते व कृष्णकुमार यांचा आधारस्तंभही होते. धीरज यांच्या अकाली निधनाने कृष्णकुमार काहिसे खचले होते. पण थकत्या वयातही त्यांनी स्वत:ला सावरले व काही दिवसातच ते पक्षाच्या कामात सक्रिय झाले होते. आता सव्वा वर्षात कृष्णकुमार यांच्या निधनाने पांडे कुटुंबीयांवर दुहेरी आघात झाला. याची एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस