लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध शासकीय कार्यालयात दलालंकडून बनावट मुद्रांक तसेच विविध प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती मिळाल्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने नऊ ठिकाणी ‘सर्जिकल स्ट्राईक; केले. पोलिसांच्या कारवाईमुळे दलाल आणि एजंटमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. काहींनी स्वत:ला वाचविण्यासाठी आपापल्या बॅग, लॅपटॉप जागीच सोडून पळ काढला. मात्र, अनेक ठिकाणी पोलिसांनी महत्त्वाच्या कागदपत्र आणि साहित्यासह दलालांना ताब्यात घेतले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश, सहायक आयुक्त शिवाजीराव बोडखे यांना या संबंधाने नियमित तक्रारी मिळत आहेत. त्यामुळे दलालांच्या विळख्यात सापडलेल्या विविध शासकीय कार्यालयात धडक कारवाई करण्याची योजना दोन दिवसांपूर्वी तयार करण्यात आली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात ‘अॅक्शन प्लान‘ तयार करण्यात आला. ठरल्याप्रमाणे कारवाईसाठी १० वेगवेगळी पथके तयार करून विविध शासकीय कार्यालयात आज एकसाथ दलालांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. त्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू कार्यालयातून ३ एजंट, आरटीओ (गिरीपेठ) कार्यालयातून १७, ग्रामीण (लाल गोदाम) ११, कळमना कार्यालयातून ११, प्रशासकीय इमारत क्र. १ मधील भूमि अभिलेख कार्यालयातून १२, नासुप्र कार्यालय ३, सह-उपनिबंधक कार्यालय (शहर-२) सक्करदरा ३ आणि तहसील कार्यालय (शहर) मधून ३ असे एकूण ६३ एजंट दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले.महापालिकेच्या संपत्ती कर तसेच जन्म मृत्यू विभाग पोलिसांच्या रडारवर आहे. मात्र, या कार्यालयातील दलालांना कारवाईचे संकेत मिळताच त्यांनी आज या परिसरातून दूर राहणेच पसंत केले. ताब्यात घेतलेल्या ज्या दलालांकडे संशयास्पद कागदपत्रे आढळली, त्यांची तपासणी करून काहींना चौकशीसाठी पुन्हा हजर होण्याची सूचना करून सोडून देण्यात आले. महापालिकेच्या संपत्ती कर तसेच जन्म मृत्यू विभाग पोलिसांच्या रडारवर आहे. मात्र, या कार्यालयातील दलालांना कारवाईचे संकेत मिळताच त्यांनी आज या परिसरातून दूर राहणेच पसंत केले.
गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राईक
By admin | Published: June 30, 2017 2:31 AM