लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कपिलननगर पोलीस ठाणे परिसरात रमी क्लबच्या नावावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरूनच उत्तर नागपूर आणि कामठीतील गुंड गुन्हेगारी धंदे चालवीत होते. कुख्यात लकी खानवर फायरिंग करणारे गुन्हेगार या अड्ड्याचे सूत्रधार आहेत. नवाब ऊर्फ नब्बू अशरफी याला जुगार अड्ड्यावर झालेल्या अटकेतून ही बाब स्पष्ट होते. या प्रकरणावरून जुगाार अड्डे गुन्हेगारांचे आश्रयस्थळ असल्याचेही स्पष्ट झाले आहे.गुन्हे शाखा पोलिसांनी २० सप्टेंबर रोजी रात्री कपिलनगर येथील पिवळी नदी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १७ आरोपींना पकडले होते. घटनास्थळी राजू पालने स्वत:ला अड्ड्याचा प्रमुख असल्याचे सांगितले होते. गुन्हे शाखेने कारवाई करून आरोपींना कपिलनगर पोलिसांच्या स्वाधीन कले होते. हा अड्डा एक महिन्यापासून पोलिसांच्या आश्रयानेच सुरू होता. त्यामुळेच आरोपींची तात्काळ जामिनावर सुटका केली.सूत्रांनुसार, हा जुगार अड्डा उत्तर नागपूर व कामठीतील गुन्हेगारांचा मोठा अड्डा होता. रात्री १२ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत येथे गुन्हेगारांची वर्दळ राहत होती. येथूनच ते अवैध धंदे चालवीत होते. या गुन्हेगारांचे मांस व वाळू तस्करी आणि जमीन बळकापण्याचे धंदे आहेत. वर्षभरापूर्वी लकी खान याच्यावर झालेल्या फायरिंगमधील आरोपी या अड्ड्याचे सूत्रधार आहेत. या फायरिंग प्रकरणात गुन्हे शाखेची भूमिकाही संशयास्पद राहिली होती. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपींची तात्काळ जामिनावर सुटका झाली. बाहेर आल्यानंतर ते पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गोळीबार चौकातील कुख्यात प्रॉपर्टी डीलर आहे. याच्याविरुद्ध फसवणुकीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. याने लकीच्या मदतीने अनेक जमिनी बळकावल्या. लकीसोबत मुंबईत ऐश करायचा. दोन-तीन मुलींवरून त्याचा लकीसोबत वाद झाला. लकी त्याच्या जमिनीच्या प्रकरणातही हस्तक्षेप करू लागला. त्यामुळे त्याने लकीच्या खुनाची सुपारी दिली होती. परंतु पोलिसांनी केवळ खानापूर्ती तपास केल्याने प्रकरण उघडकीस आले नाही.टोळीयुद्ध भडकण्याची शक्यतागुन्हे शाखेच्या कारवाईमुळे लकी अणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही टोळींतील सदस्य एकमेकांना संशयाने पाहत आहेत. सूत्रांसार गुन्हेगार अड्ड्यावरील धाडीनंतर लकी खानला संशयाने पाहत आहेत. दुसरीकडे लकीसुद्धा त्यांना अद्दल घडवण्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत कुठल्याही क्षणी टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुन्हेगारी : जुगार अड्ड्यावरून चालत होते अवैध धंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 10:39 PM
कपिलननगर पोलीस ठाणे परिसरात रमी क्लबच्या नावावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरूनच उत्तर नागपूर आणि कामठीतील गुंड गुन्हेगारी धंदे चालवीत होते. कुख्यात लकी खानवर फायरिंग करणारे गुन्हेगार या अड्ड्याचे सूत्रधार आहेत.
ठळक मुद्दे लकी खान फायरिंगमधील गुन्हेगार आहेत सूत्रधारकपिलनगर पोलिसांचे होते संरक्षण