शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

नागपुरातील माय डायल डिजिटलच्या संचालकांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 8:18 PM

प्रत्येक महिन्याला २० टक्के रक्कम नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जाहिरातीसाठी एलईडी होर्डिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या येथील माय डिजिटल कंपनीच्या बनवाबनवीचा फुगा अखेर फुटला. कंपनीचा संचालक आकाश सरोदे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सदर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. सरोदे आणि त्याच्या साथीदारांनी विविध प्रांतातील ठेवीदारांना पावणेचार कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्दे१० महिन्यात रक्कम दुप्पट देण्याचे आमिषकोट्यवधींचा गंडा, डेहराडूनच्या महिलेची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येक महिन्याला २० टक्के रक्कम नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जाहिरातीसाठी एलईडी होर्डिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या येथील माय डिजिटल कंपनीच्या बनवाबनवीचा फुगा अखेर फुटला. कंपनीचा संचालक आकाश सरोदे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सदर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. सरोदे आणि त्याच्या साथीदारांनी विविध प्रांतातील ठेवीदारांना पावणेचार कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.सरोदे आणि साथीदारांनी छावणी सदरमधील गोंडवाना चौकातील इमारतीत माय डायल डिजिटल एलईडी अ‍ॅन्ड मीडिया प्रा. लि. कंपनी नावाने तीन वर्षांपूर्वी दुकानदारी सुरू केली होती. आपल्या कंपनीला प्रधानमंत्री स्मार्ट सिटी एलईडी प्रकल्पांतर्गत देशातील विविध शहरांत डिजिटल होर्डिंगद्वारे जाहिरात प्रसारणाचे कंत्राट मिळाले आहे, अशी बतावणी ते करीत होते. काम खूप मोठे आणि नफा खूप जास्त असल्याने यात गुंतवणूक करणाऱ्यांना महिन्याला २० टक्के रक्कम नफा मिळेल. अर्थात, एक लाख रुपये गुंतविल्यास पुढच्या १० महिन्यात प्रत्येकी २० हजार रुपये मिळतील. म्हणजेच १० महिन्यात तुमची रक्कम दुप्पट होईल. तुम्ही तुमच्या ओळखीच्यांना, नातेवाईकांना गुंतवणुकीस प्रोत्साहित केल्यास तुम्हाला तुमचे वेगळे कमिशन मिळेल, असेही आरोपी सांगत होते. त्याला बळी पडून डेहराडून (उत्तराखंड) मधील शाहनगरात (डिफेन्स कॉलनी) राहणाऱ्या पार्वती सूरजमनी चमोली (वय २८) यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी ५२ लाख ५६ हजार तर, त्यांच्या ओळखीच्यांनी २ कोटी ४८ लाख ४२ हजार २०० रुपये गुंतविले. एलईडी खरेदीच्या नावाखाली ५६ लाख ५० हजार ५०० रुपये जमा केले. अशाप्रकारे ३ नोव्हेंबर २०१७ पासून चमोली आणि त्याच्या ओळखीच्यांनी सरोदे आणि साथीदारांच्या कंपनीत एकूण ३ कोटी ५७ लाख ४८ हजार रुपये गुंतविले. सुरुवातीचे दोन महिने व्याज दिल्यानंतर सरोदे आणि साथीदारांनी त्यांना टाळणे सुरू केले. संशय आल्यामुळे सरोदे आणि साथीदारांची भेट घेण्यासाठी २३ जुलै २०१८ ला डेहराडूनमधील मंडळी नागपुरात आली. येथे आल्यानंतर त्यांना त्यांच्यासारखीच अनेकांची रक्कम आरोपींनी हडपल्याचे त्यांच्या ध्यानात आले.त्यामुळे त्यांनी आपली रक्कम परत मागण्यासाठी सरोदे आणि कंपनीच्या मागे तगादा लावला. प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करणाऱ्या आरोपींनी नंतर आपले कार्यालयही बंद केले. आपली रक्कम परत मिळणार नाही, अशी खात्री पटल्याने अखेर चमोली आणि त्यांच्या नातेवाईकांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आकाश हरिदास सरोदे (वय ४०, रा. वैशाली नगर, पाचपावली), अभिजित गोपाल देव (वय ३२) आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीचे कलम ४२०, ४०६, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंबंध संरक्षण कायद्याचे सहकलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी