शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

कोर्टाच्या आदेशानंतर सहा पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे

By admin | Published: December 19, 2014 12:41 AM

सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी भगवान पाटेकर यांची बाजू उचलून धरत उच्च न्यायालयाने लाचलुचपत विभागाच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकासह सहा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे

निवृत्त डीवायएसपीवर भ्रष्टाचाराचा आरोपअमरावती : सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी भगवान पाटेकर यांची बाजू उचलून धरत उच्च न्यायालयाने लाचलुचपत विभागाच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकासह सहा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूकप्रकरणी या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक मंगलजित सिरम, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण धोटे, निरीक्षक गिरीश बोबडे यांच्यासह सहा अधिकाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आले होते. आरोपाच्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक असलेले मंगलजित सिरम, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण धोटे, निरीक्षक गिरीश बोबडे यांच्याशिवाय एकनाथ खडसे, अरविंद पांडे आणि संतोष वर्मा यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. माहितीनुसार, या पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. भगवान पाटेकर हे पोलीस निरीक्षक असताना त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी होते. या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती गोळा केल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे निनावी पत्राद्वारे कळविण्यात आले होते. त्यावेळी एसीबीचे अधीक्षक सिरम यांच्यासह वरील अधिकाऱ्यांनी पाटेकर यांच्या संपत्तीची चौकशी केली. आरोपानुसार पाटेकर यांना यामध्ये अडकविण्यासाठी बनावट दस्तऐवजांच्या आधारे निलंबितही करण्यात आले होते. मात्र पाटेकर यांच्या म्हणण्यानुसार वरील अधिकारी त्यांना अडकविण्यासाठी प्रयत्न करीत होते. २२ सप्टेंबर २००६ रोजी पाटेकर यांनी या आरोपासंदर्भात फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, तत्कालीन ठाणेदार शिवा ठाकूर यांनी त्यांची तक्रार न घेता ज्यांच्याविरोधात तक्रार आहे ते वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे यासंदर्भात गुन्हा दाखल करू शकत नाही. त्यामुळे पाटेकर यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना नोटीस बजावली होती. त्यानंतरही एसीबीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नव्हती. न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात पाटेकर यांच्या बाजूने निर्णय दिला होता. याबाबतच्या प्रती दोन दिवसांपूर्वीच स्थानिक न्यायालयाला प्राप्त झाल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार फ्रेजरपुरा पोलिसांनी एसपी मंगलजित सिरम यांच्यासह सहा अधिकाऱ्यांविरुद्ध बुधवारी सायंकाळी गुन्हे दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)