लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : नागरिकांसह व्यावसायिकांना काेराेना प्रतिबंधक उपाययाेजना आणि लाॅकडाऊन दिशानिर्देशांचे काटेकाेर पालन करावे, यासाठी पाेलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. या दिशानिर्देशाचे उल्लंघन करणाऱ्या १४ व्यावसायिकांवर कारवाई करीत गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. ही कारवाई खापरखेडा (ता. सावनेर) येथे नुकतीच करण्यात आली.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने काही प्रतिबंधात्मक उपाययाेजना जाहीर केल्या असून, लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या लाॅकडाऊन काळात दुकाने नियाेजित वेळी उघडणे आणि बंद करणे सर्वांनाच बंधनकारक केले आहे. मात्र, खापरखेडा परिसरात या दिशानिर्देशाचे उल्लंघन हाेत असल्याचे लक्षात येताच, पाेलिसांनी संबंधित दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आहे. यात खापरखेडा पाेलिसांनी राजू लखनलाल शाहू, लतीफ बसारत अली सिद्धीकी, गाेलू राजाराम शाहू, साजन मनाेज मिश्रा यांच्यासह एक महिला दुकानदार सर्व रा. चनकापूर, ता. सावनेर, आतिश भाेजराज निमगडे, फारुक मुस्तफा कुरेशी, अजहर असराईल शेख, किशाेर महादेव गजभिये, सुरेश रामचंद्र सूर्यवंशी, नितीन नानाजी बावसकर सर्व रा. खापरखेडा, ता. सावनेर, माेहम्मद अच्छन छेदू शेख राईन, रा. वलनी, ता. सावनेर, सुरेश वसंत किसने, रा. बजरंगनगर, कामठी, बुद्धराज कमलेश केवट, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर यांचा समावेश आहे. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि १८८ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे.