शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

सीसीटीव्हीमुळे सापडला गुन्हेगार

By admin | Published: July 24, 2016 2:21 AM

इमामवाडा येथील कराटे खेळाडू असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पकडण्यास मेडिकल चौकातील सीसीटीव्ही फुटेजची मदत मिळाली.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण : २४ तासात जाळ्यात नागपूर : इमामवाडा येथील कराटे खेळाडू असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पकडण्यास मेडिकल चौकातील सीसीटीव्ही फुटेजची मदत मिळाली. या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर गुन्हे शाखा पोलिसांनी सराईत गुन्हेगारास २४ तासात अटक केली. पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत यासंबंधात सविस्तर माहिती दिली. नितीन अनिल जयस्वाल ऊर्फ सोनू गुप्ता (२५) रा. रामबाग कॉलनी असे आरोपीचे नाव आहे. तो इलेक्ट्रीशियनचे काम करतो. आरोपी सोनू मूळचा वर्धा येथील राहणारा आहे. त्याच्याविरुद्ध छेडखानीचे यापूर्वी सुद्धा दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीसोबत पीडित मुलीला जाताना पाहणारे साक्षीदारसुद्धा पोलिसांना सापडले. परंतु स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आल्यासंदर्भातील प्रश्नाचे उत्तर मात्र नकारार्थी देण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य आणि नागरिकांमध्ये असलेला असंतोष पाहता आरोपी तातडीने पकडले जाणे पोलिसांसाठी आवश्यक होते. त्यानुसार पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. आरोपीविरुद्ध पोलिसांनी सबळ पुरावे जमा केले आहेत. आता हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासंदर्भात शिफारस केली जाईल, असेही सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अपर पोलीस आयुक्त सुहास वारके, गुन्हे शाखेचे प्रभारी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा उपस्थित होते.(प्रतिनिधी) मिशी कापली, मोबाईलही केला बंद सराईत आरोपी असलेल्या सोनू गुप्ताने घटनेनंतर त्याच्या जवळच्या मोबाईलचे सीमकार्ड आणि बॅटरीसुद्धा काढून ठेवली होती. यानंतर तो वस्तीतून फरार झाला होता. इतकेच नव्हे तर ओळखले जाऊ नये म्हणून त्याने मिशीसुद्धा काढून घेतली होती. काय आहे प्रकरण आरोपी सोनू हा पीडित मुलीच्या वस्तीतच राहतो. त्यामुळे तो पीडित मुलगी व तिच्या बहिणीला ओळखत होता. त्याला पीडित मुलीच्या येण्या-जाण्याची वेळ व रस्ता माहीत होता. त्यामुळे आरोपी सोनूने २१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मुलीला मेडिकल चौकात थांबवून तिच्याशी चर्चा केली. तिला सांगितले की, तिच्या बहिणीचे एका मुलाशी प्रेमसंबंध आहे. दोघेही मेडिकलच्या टीबी वॉर्डातील एका जुन्या क्वॉर्टर परिसरात भेटतात. तिला ती जागा दाखविण्यासाठी सोबत चलण्यास सांगितले. परंतु तेव्हा ती मुलगी घरी निघून गेली. काही वेळानंतर ती कराटे क्लाससाठी बाहेर पडली. सायंकाळी ७.३० वाजता परत येताना आरोपी सोनूने तिला पुन्हा थांबविले आणि टीबी वॉर्डातील ती जागा दाखविण्यासाठी सोबत घेऊन गेला. हा सर्व घटनाक्रम मेडिकल चौकातील काही दुकानांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला.