लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने काही महिन्यांपूर्वी दिले होते. महाराज बाग प्राणिसंग्रहालयाने प्राधिकरणाने दिलेल्या अटींची पूर्तता न केल्याने तसेच याबाबत वारंवार ताकीद देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु महाराज बाग प्रशासनाने यासंदर्भात केंद्रीय वन, पर्यावरण विभागात दाद मागितली होती. त्यानुसार केंद्रीय वन, पर्यावरण विभागाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने दिलेल्या आदेशावर स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराज बागेवरील संकट तूर्तास टळले असून महाराज बाग प्रशासनाला सुधारीत आराखडा पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची स्थापना १८९४ मध्ये झाली. महाराज बागची जबाबदारी डॉ पंजाबवराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे सोपवली. कृषी महाविद्यालयाकडे महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे व्यवस्थापन होते. मात्र महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील पिंजरे, प्राण्यांची व्यवस्था आणि इतर सर्व बाबींची पूर्तता करण्यात महाराज बाग व्यवस्थापन असमर्थ ठरत असल्याचा ठपका ठेवत या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने घेतला. परंतू केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने घेतलेला निर्णय अयोग्य असून महाराज बाग प्राणिसंग्रहालय व्यवस्थापन पुरेपूर आपली जबाबदारी सांभाळत आहे. उलट या प्राणिसंग्रहालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आणि इतर समस्यांसाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालयाकडे महाराज प्राणिसंग्रहालय प्रशासनाने दाद मागितली. परंतु यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे मत केंद्रीय वन, पर्यावरण विभागाकडे महाराज बाग प्रशासनाने मांडले. याबाबत दोन्ही विभागाचे म्हणणे ऐकून केंद्रीय वने, पर्यावरण विभागाने केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या आदेशावर तूर्तास स्थगिती दिली आहे. तर केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने सुचविलेल्या अटींची पूर्तता करण्यावर महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचा भर राहणार असल्याची माहिती महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांनी दिली.
महाराजबागवरील संकट टळले : मान्यता रद्द करण्याच्या आदेशास स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:39 AM
कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने काही महिन्यांपूर्वी दिले होते. महाराज बाग प्राणिसंग्रहालयाने प्राधिकरणाने दिलेल्या अटींची पूर्तता न केल्याने तसेच याबाबत वारंवार ताकीद देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु महाराज बाग प्रशासनाने यासंदर्भात केंद्रीय वन, पर्यावरण विभागात दाद मागितली होती. त्यानुसार केंद्रीय वन, पर्यावरण विभागाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून केंद्रीय प्राणिसंग्रहालयाने दिलेल्या आदेशावर स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराज बागेवरील संकट तूर्तास टळले असून महाराज बाग प्रशासनाला सुधारीत आराखडा पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देसुधारीत आराखडा पाठविण्याच्या सूचना