लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाचा वेग कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. यातच गंभीर रुग्णांची संख्या वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी ६,२४४ नव्या रुग्णांची भर पडली, तर ४८ रुग्णांचे जीव गेले. सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली. ३,०९५ रुग्ण व ३३ मृत्यू झाले. नागपूरनंतर बुलडाण्यात रुग्ण झपाट्याने वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या ८००वर पोहोचली. जिल्ह्यात ८६१ रुग्ण आढळून आले. यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा वेग वाढला. रुग्णसंख्या ५५६ झाली असून, १० रुग्णांचे बळी गेले. अमरावती जिल्ह्यात ५१४ रुग्णांची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात ३३२ रुग्ण व ३ मृत्यू, तर वाशिम जिल्ह्यात २१० रुग्ण पॉझिटिव्ह आले. नागपूर विभागातील गोंदिया व गडचिरोली हे दोन जिल्हे सोडल्यास इतर चार जिल्ह्यात रुग्ण वाढताना दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात २४९ रुग्ण व २ मृत्यू, भंडारा जिल्ह्यात १९८ रुग्ण, तर चंद्रपूर जिल्ह्यात ११२ रुग्णांची नोंद झाली आहे.
नागपूर :
जिल्हा : रुग्ण : ए.रुग्ण : मृत्यू
नागपूर : ३०९५ : १९९७७१ : ३३
गोंदिया :४८ : १५१९२ : ००
भंडारा :१९८ : १५४०२ : ००
चंद्रपूर :११२: २५९६८:००
वर्धा : २४९ : १ ६९२८: ०२
गडचिरोली :६९ : १०२३३ : ००
अमरावती : ५१४ : ४६२७४ : ००
यवतमाळ :५५६ : २५३९६: १०
वाशिम :२१० : १३४१०: ००
बुलडाणा : ८६१ : ३१४७४: ००
अकोला : ३३२: २५१०८ : ०३