लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेच्या आवाहनानुसार केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने शुक्रवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.केंद्र शासनाच्यावतीने कामगारांच्या विरोधी धोरण राबविण्यात येत आहे. त्यामुळे या धोरणाचा निषेध करण्याचे आवाहन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेने केले होते. त्यानुसार सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने ‘डीआरएम’ कार्यालयासमोर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. आंदोलनात रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्यास आणि कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. आंदोलनात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांना मागण्यांचे निवेदन सोपविण्यात आले. यावेळी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सचिव बंडु रंधई, सचिव जी. एम. शर्मा, विभागीय संघटक सी. पी. सिंह, डी. डी. सिंह, विजय बुरडे, अभिजित कंडवा, वाय. डब्ल्यू. गोपाल, बब्बु बिंद्रावन, पी. एन. तांती, के. पी. सिंह, बंसमनी शुक्ला, पीतांबर, रमेश पटनायक, इंद्र दमाये, गोपाल मुदलीयार, संजय आत्राम उपस्थित होते.
सीआरएमएस’ने केला कामगार विरोधी धोरणांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 12:26 AM
नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेच्या आवाहनानुसार केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने शुक्रवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्दे‘डीआरएम’ला सोपविले निवेदन