लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : काेराेना संक्रमणाला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ मार्चपर्यंत आठवडी बाजारांवर बंदी घातली आहे; मात्र केळवद (ता. सावनेर) येथे गुरुवारी (दि. २५) भरलेल्या आठवडी बाजारात ग्राहकांनी भाजीपाला व इतर गृहाेपयाेगी साहित्य खरेदी करण्यासाठी माेठी गर्दी केली हाेती. ग्राहकांमध्ये मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचा माेठा अभाव दिसून आल्याने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचा फज्जा उडाला हाेता.
केळवद येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरताे. या बाजारात परिसरातील लगेच लगतच्या मध्य प्रदेशातील गावांमधील नागरिक खरेदीसाठी तर नागपूर, सावनेर यांसह अन्य शहरे व गावांमधील दुकानदार व व्यापारी भाजीपाल्यासह अन्य वस्तूंची विक्री करण्यासाठी नियमित येतात. केळवद येथील आठवडी बाजार प्रशस्त मैदानावर भरत नसून, ताे गावातील राेडलगत भरताे. गावातील राेड अरुंद असल्याने राेडलगतची दुकाने आणि खरेदीसाठी आलेले ग्राहक यांची चांगलीच गर्दी हाेते. या गर्दीतून पायी वाट करणे मुश्कील असते.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काही काळ आठवडी बाजारावर बंदी घातली असताना केळवद येथील आठवडी बाजार भरला हाेता. बाजारात आलेले बहुतांश दुकानदार व ग्राहक विना मास्क फिरत हाेेते. फिजिकल डिस्टन्सिंगचा थांगपत्ता नव्हता. बाजारात आलेल्या व्यक्तींपैकी काेण काेराेना पाॅझिटिव्ह आणि काेण निगेटिव्ह, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे बाजारातील गर्दी व नागरिकांचा हलगर्जीपणा काेराेनाच्या संक्रमणास कारणीभूत ठरू शकताे, अशी शक्यताही वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली.
...
१४ जणांना काेराेनाची लागण
केळवद प्राथमिक आराेग्य केंद्रात राेज काेराेनाची टेस्ट केली जात आहे. या प्राथमिक आराेग्य केंद्राच्या हद्दीतील गावांमध्ये १८ ते २५ फेब्रुवारी या काळात १४ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे त्यांच्या टेस्टवरून स्पष्ट झाले आहे. यात १३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्यावर औषधाेपचार सुरू करण्यात आला असून, त्यांना गृह विलिगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशाेर गजभिये यांनी दिली. दुसरीकडे, काेराेना संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करावे, असे आवाहन सरपंच गीतांजली वानखेडे, उपसरपंच सुधाकर बाेंद्रे, ठाणेदार दिलीप राठाेड, ग्रामसेवक साेमकुवर यांनी केले आहे.
...
जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजारांवर काही काळ बंदी घातली आहे. केळवद येथील बाजार आणि त्यातील नागरिकांची गर्दी पाहता, ग्रामपंचायतचे सचिव साेमकुवर यांच्याशी फाेनवर वारंवार संपर्क साधला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिवाय, संपर्कही केला नाही. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी गंभीर बाब आहे.
- दिलीप ठाकूर, ठाणेदार,
केळवद, ता. सावनेर.