लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (पचखेडी) : केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने रविवारी आत्महत्या केल्याने कुही तालुक्यात खळबळ उडाली आहे. सुशील सुधाकर भेंडे (२७)असे मृत जवानाचे नाव आहे. तो कुही तालुक्यातील खेडा येथील रहिवाशी आहे. रविवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास सुशीलने गावाशेजारील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.सुशील गत सहा वर्षांपासून कोल्हापूर येथे सीआरपीएफ पोलीस म्हणून तैनात होता. त्याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या पत्नीचे माहेर नागपूर येथील आहे. सुशीलने रागाच्या भरात कोल्हापूर येथे मारहाण केली होती. त्यामुळे वरिष्ठांकडून त्याला एक महिन्याभरापूर्वी निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून तो नैराश्यात होता. तो आठ दिवसांपूर्वी खेडा या मूळगावी पत्नी पायलसोबत आला होता. दोन दिवसांपूर्वी पायल माहेरी नागपूर येथे आली होती. पत्नी घरी नसल्याचे पाहून त्याने गावाशेजारील शेतात आत्महत्या केली. सदर प्रकरणाचा तपास वेलतूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय अहिरकर करीत आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सुशीलचा मृतदेह कुही येथे हलविला.
नागपूर जिल्ह्यातील कुही भागात सीआरपीएफ जवानाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 8:47 PM
केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने रविवारी आत्महत्या केल्याने कुही तालुक्यात खळबळ उडाली आहे. सुशील सुधाकर भेंडे (२७)असे मृत जवानाचे नाव आहे. तो कुही तालुक्यातील खेडा येथील रहिवाशी आहे. रविवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास सुशीलने गावाशेजारील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
ठळक मुद्दे मध्यरात्री शेतात घेतला गळफास