नागपूर : केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) च्या हिंगणा केंद्रामध्ये रक्षाबंधनच्या पर्वावर सहेली समितीच्या सदस्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. आपल्या घरापासून लांबवर प्रशिक्षणासाठी येथे असणारे हे जवान या प्रसंगामुळे भावूक झाले.
जवानांसह प्रशिक्षित जवान आणि अधिकाऱ्यांच्या हातावर राख्या बांधण्यासोबतच या भगिनींनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी ग्रुप केंद्र नागपूरचे डीआयजी प्रशांत जांभाेळकर, अतिरिक्त प्रशिक्षण केंद्र के कमांडंट सुभाष चंद्र, क्षेत्रीय परिवार कल्याण संस्था सीआरपीएफ, नागपूरच्या अध्यक्ष कीर्ती जांभाेळकर, उपाध्यक्ष ओमप्रभा यांच्यासह अधिकारीगण उपस्थित होते.
कमांडंट सुभाष चंद्र याननी दिलेल्या माहितीनुसार, ग्रुप केंद्रात एकूण ४१७ प्रशिक्षणार्थी जवान आहेत. त्यापैकी ४५ जवानांच्या बहिणी राख्या बांधण्यासाठी येथे आल्या होत्या. अन्य जवानांना सहेली समितीच्या सदस्यांनी आणि युवतींनी राख्या बांधल्या. या कार्यक्रमामुळे आपले मनोबल वाढल्याच्या भावना अनेक जवानांनी व्यक्त केल्या.