लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उघड्यावर अन्न शिजवणे, काळवंडलेल्या टेबल-खुर्च्यावर ग्राहकांना खायला देणे, पिण्याचे रिकामे झालेले ग्लास न धुताच तसेच भरुन पुन्हा पाणी पुरविणे, असा किळसवाणा प्रकार संत्रा मार्केटकडील बहुतांश हॉटेल्समध्ये पाहावयास मिळाला. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक असून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.संत्रा मार्केटकडील हॉटेल्समध्ये ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविण्यात येत असल्याची माहिती मिळताच ‘लोकमत’ने या भागातील हॉटेल्सची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव उजेडात आले. संत्रा मार्केटकडील बहुतांश हॉटेल्समध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होताना दिसला. स्वच्छतेच्या दृष्टीने हॉटेल्समध्ये काहीच खबरदारी घेतल्या जात नसल्याची बाब दृष्टीस पडली.उघड्यावर किचनसंत्रा मार्केटकडील भागात असलेल्या बहुतांंश सर्वच हॉटेल्सचे किचन रस्त्याच्या कडेला आहेत. खाद्यपदार्थ तयार करताना रस्त्यावरील धूळ हवेद्वारे उडून जेवणात मिसळते. उघड्यावरच हॉटेल्समधील स्वयंपाकी मोठमोठ्या पातेल्यात बिर्याणी तयार करताना आढळले. अन्न पदार्थांमध्ये मिसळणाऱ्या धुळीच्या कणांमुळे ग्राहकांना विविध आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे..स्वयंपाकाची भांडीही घाणेरडीस्वयंपाक केल्यानंतर त्यातील अन्न संपेपर्यंत ते भांडे तसेच ठेवण्यात येते. पुन्हा स्वयंपाक करण्याच्या पूर्वी ते भांडे थातूरमातूर पद्धतीने धुण्यात येते. यामुळे बहुतांश हॉटेल्समधील भांडी घाणेरडी असल्याचे पाहणीत आढळून आले. याच घाणेरड्या भांड्यात अन्न शिजवून ते ग्राहकांना पुरविण्यात येते. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीच काळजी हॉटेल्समध्ये घेण्यात येत नसल्याची बाब निदर्शनास आली.कोंदट वातावरणात बसण्याची व्यवस्थाअतिशय अरुंद जागेत किचन, खाद्यपदार्थ ठेवण्याची आणि ग्राहकांच्या बैठकीची व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे. यामुळे कोंदट वातावरणात बसून ग्राहकांना जेवण करावे लागते. दुसरा पर्याय म्हणजे ग्राहकांसाठी रस्त्याच्या कडेला टेबल खुर्च्या टाकून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात रस्त्यावरील धूळ सहज टेबलवर उडते. त्यामुळे आत बसल्यास घाणेरडे वातावरण आणि बाहेरही धुळीचे साम्राज्य अशी परिस्थिती पाहावयास मिळाली.ग्लास न धुताच देतात पाणीएका हॉटेलमध्ये काही काळ थांबल्यानंतर एक धक्कादायक प्रकार दिसला. हॉटेलमध्ये पिण्याचे पाणी पुरविणारा कामगार सात-आठ ग्लासचा ट्रे रिकामा झाल्यानंतर ट्रे घेऊनहॉटेलमधील बेसिनजवळ जात होता. तेथे ट्रे मधील ग्लास खाली काढून धुण्याऐवजी पुन्हा त्याच ग्लासमध्ये पाणी भरून हा कर्मचारी ग्राहकांना पाणी देताना दिसला. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची बाब उजेडात आली.काही पैशांसाठी आरोग्याशी तडजोडसंत्रा मार्केटकडील भागात ग्राहकांना कमी पैसे देऊन जेवण किंवा नाश्ता पुरविण्यात येतो. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील असंख्य प्रवासी या हॉटेल्समध्ये धाव घेतात. पैसे कमी लागत असले तरी आरोग्यासाठी या हॉटेल्समधील स्वच्छता धोकादायक आहे, या गंभीर बाबीकडे ग्राहक दुर्लक्ष करतात. यामुळे ग्राहकांना विविध आजार जडण्याची शक्यता निर्माण होते.घरगुती सिलिंडरचा वापर
नागपूरच्या संत्रा मार्केटकडील हॉटेल्समध्ये अस्वच्छतेचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:29 AM
उघड्यावर अन्न शिजवणे, काळवंडलेल्या टेबल-खुर्च्यावर ग्राहकांना खायला देणे, पिण्याचे रिकामे झालेले ग्लास न धुताच तसेच भरुन पुन्हा पाणी पुरविणे, असा किळसवाणा प्रकार संत्रा मार्केटकडील बहुतांश हॉटेल्समध्ये पाहावयास मिळाला. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक असून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
ठळक मुद्देग्राहकांचे आरोग्य धोक्यात : उघड्यावर किचन, ग्लास न धुताच देतात पाणी