लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीला दोषी ठरवून त्याची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना पारशिवनी तालुक्यातील आहे.घनश्याम मारोती हिवसे (५२) असे आरोपीचे नाव असून, तो केराली येथील रहिवासी आहे. चिनबा गुलाब खंडार, असे जखमीचे नाव आहे. १६ आॅगस्ट २००४ रोजी आरोपी व त्याची पत्नी खंडारच्या शेतातून बैलबंडी नेत होते. शेतात सोयाबीनचे पीक होते. पीक खराब होऊ नये म्हणून खंडारने त्यांना टोकले. त्यावरून आरोपीने खंडारसोबत जोरदार भांडण केले. दुसऱ्या दिवशी खंडार आरोपीच्या घरापुढून जात होता. त्यावेळी आरोपीने त्याला टोकले व त्याच्या चेहºयावर वासल्याने वार केला. त्यामुळे खंडारच्या चेहऱ्यावर खोलवर जखम झाली. तो थोडक्यात बचावला.१५ एप्रिल २००६ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०७(खुनाचा प्रयत्न)अंतर्गत दोषी ठरवून, चार वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता, सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून आरोपीचे अपील फेटाळून लावले. आरोपीने ताकदीने वार केला होता. त्यामुळे जखमीचा मृत्यू होऊ शकला असता, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. आरोपी सध्या जामिनावर असून त्याला कारागृहात धाडण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
खुनी हल्ला करणारा आरोपी दोषीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:03 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीला दोषी ठरवून त्याची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना पारशिवनी तालुक्यातील आहे.
ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : शिक्षा कायम ठेवली