लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : करन्सी एक्सचेंज टोळीचे तार खासगी आणि सरकारी बँक अधिकाºयांशी जुळले असल्याची माहिती समोर आली आहे. बॅक अधिकाºयांच्या माध्यमातून ही टोळी अनेक दिवसांपासून करन्सी एक्सचेंज चा धंदा करीत होती. एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटांच्या मोबदल्यात आरोपींना २५ लाख रुपये मिळणार होते. गुन्हे शाखेतील सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केलेला बिल्डर व दारू व्यापारी प्रसन्ना पारधी याला एक दिवसाच्या पोलीस कोठडीत घेतले आहे. प्राथमिक चौकशीत प्रसन्ना याने फरार आरोपी कुमार चुुगानीला टोळीबाबत पूर्ण माहिती असल्याचे सांगितले आहे.गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी कोराडी रोडवरील एका फ्लॅटवर धाड टाकून ९७ लाख ५० हजार रुपयाच्या जुन्या नोटा जप्त केल्या होत्या. या धाडीदरम्यान प्रसन्नाने गुन्हे शाखेच्या एका अधिकाºयाला फ्लॅटमध्येच बंधक बनविले होते. त्यामुळे पोलिसांची फजितीही झाली होती. फ्लॅटमधून पोलिसांनी प्रसन्नाला अटक केली होती. त्याचा साथीदार कुमार चुगानी, ऋषी, वर्धा येथील एक डॉक्टर आणि दोन इतर साथीदार फरार झाले होते. प्रसन्नाने ४८ लाख रुपये स्वत:चे असल्याचे सांगितले होते.सूत्रानुसार या फ्लॅटमध्ये मंगळवारी सायंकाळी अडीच कोटी रुपये येणार होते. ते घेण्यासाठी खासगी बँकेचा एक अधिकारी येणार होता. खासगी बँक अधिकाºयाच्या माध्यमातून सरकारी बँक अधिकाºयाकडे ही रक्कम सोपविण्यात येणार होती. काही दिवसानंतर आरोपींना २५ टक्के रक्कम परत मिळणार होती. गुन्हे शाखा पोलीस प्रसन्नाने दिलेल्या माहितीच्या आधारावर कुमार आणि इतर लोकांच्या भूमिकेचीही चौकशी करीत आहे. बुधवारी पोलिसांनी रामदासपेठ येथील बंगल्याचीही झडती घेतली. परंतु तेथून काहीही पुरावे हाती आले नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अनेक गोष्टी समोर येऊ शकतात. गुन्हे शाखा पोलिसांनी प्रसन्ना पारधीला बुधवारी न्यायालयासमोर सादर करून एक दिवसाची पोलीस कोठडी मिळविली. दरम्यान कुमार चुगानीने अंतरिम जामीन मिळविला.
करन्सी एक्सचेंज टोळीचे तार बँक अधिकाºयांशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:18 AM
करन्सी एक्सचेंज टोळीचे तार खासगी आणि सरकारी बँक अधिकाºयांशी जुळले असल्याची माहिती समोर आली आहे.
ठळक मुद्देप्रसन्ना पारधी याला एक दिवसाची कोठडी : जुन्या एक कोटींच्या नोटांऐवजी मिळणार होते २५ लाख रुपये