लोकमत विशेषवसीम कुरेशीनागपूर : कोरोनाच्या संकटामुळे एसटी बसच्या दोन सीट मध्ये पडदा लावण्यात येणार आहे. कोरोना पासून प्रवाशांचा बचाव करण्यासाठी आणि महसूल वाढविण्यासाठी ही कसरत करण्यात येत आहे.कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. काही दिवसांपूर्वीच मोजक्या मार्गावर बसेस सुरू झाल्या आहेत. परंतु फिजीकल डिस्टसिंग ठेवण्यासाठी ४४ सीटर बसेसमध्ये केवळ २२ प्रवाशांना बसविण्यात येत आहे. पूर्ण क्षमतेने प्रवासी बसविण्यासाठी पडद्यांचा आधार घेण्यात येत आहे. एसटी बसेस बंद असल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे दोन सिटच्या मध्ये पडदा लावण्याची घोषणा करण्यात आली होती. एसटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रायोगिक तत्वावर पुण्यात काही बसेस मध्ये पडदा लावण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागात २५ ते ३० टक्के बसेस सुरू आहेत.
औरंगाबाद, हैदराबादला लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. विभागातील सर्वात मोठ्या गणेश पेठ बस स्थानकाच्या अंतर्गत बसेस ४० हजार किलोमीटर अंतर पूर्ण करीत होत्या. परंतु कोरोनामुळे सध्या १० हजार किलोमीटरचे अंतर बसेस पूर्ण करीत आहेत. यामुळे एसटीचे किती नुकसान होत असेल याचा अंदाज येतो. एसटीला सध्या खूप प्रवासी मिळत आहेत परंतु शारीरिक अंतर राखण्यासाठी केवळ २२ प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. परंतु शारीरिक अंतरामुळे एसटीचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी २ सीटमध्ये पडदे लावण्याची तयारी सुरू आहे. बसमध्ये प्रवासी पूर्ण क्षमतेने बसल्यानंतर एसटीचे नुकसान भरून निघणार आहे. नाहीतर एकटीचे खूप नुकसान होईल.नुकसान होत असताना जास्तीचा खर्चखूप दिवस बस बंद असल्यामुळे एसटीचे नुकसान झाले. अशा स्थितीत दोन सीटमध्ये पडदा लावण्यासाठी खर्च येणार आहे. तज्ञांच्या मते या विषयावर विचारही करण्यात येत आहे.पूर्ण प्रवासी मिळाल्यावर होईल फायदाबस मध्ये ४४ प्रवासी चढल्यानंतर एसटी'ला फायदा होणार आहे. परंतु दिलेल्या निर्देशानुसार २२ प्रवाशांनाच बस मध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. बसच्या दोन सीट मध्ये पडदा लावण्याचा विचार सुरू आहे. या बाबत परिपत्रक मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.निलेश बेलसरे विभाग नियंत्रक नागपूर विभाग