शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

गणेशपेठमध्ये ‘कस्टडी डेथ’

By admin | Published: December 14, 2014 12:46 AM

गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. ‘कस्टडी डेथ’चे हे प्रकरण दडपण्यासाठी गणेशपेठ पोलिसांनी जोरदार प्रयत्न केले.

मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू : पोलीस दलात खळबळनागपूर : गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. ‘कस्टडी डेथ’चे हे प्रकरण दडपण्यासाठी गणेशपेठ पोलिसांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, वरिष्ठांना कुणकुण लागल्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. सचिन अनिल वाघधरे (वय ३४) असे मृताचे नाव आहे. तो मॉडेल मिल चाळीत राहात होता. ८ डिसेंबरला दारू विक्रीच्या आरोपात त्याला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘साहेबांना हप्ता न देता धंदा करतो’, असे म्हणत त्याला प्रारंभी एका कर्मचाऱ्याने आणि नंतर ठाणेदाराने मारहाण केल्याचे समजते. जबर मारहाणीमुळे सचिनची प्रकृती ढासळली. ठाण्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, सचिनने प्रकृती चांगली वाटत नसल्याची तक्रार केली होती. मात्र, ‘साहेबांनी’ त्याला नाटक करतो, असे म्हणत शिवीगाळ केल्याचे समजते. दरम्यान, योग्य वेळी वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे सचिनची प्रकृती ढासळतच गेली. तो अत्यवस्थ झाल्यानंतर पोलिसांनी त्याला मेयोत दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर शर्थीचे औषधोपचार केले. मात्र, शुक्रवारी सचिनचा मृत्यू झाला. कस्टडीतील आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे गणेशपेठ ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनी या प्रकरणाचा बोभाटा होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. शुक्रवारी रात्री या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याबाबत तक्रार करू नये म्हणून कारवाईचा धाक दाखवून मृताच्या नातेवाईकांवरही दडपण आणण्यात आल्याचा आरोप आहे. रात्री आणि आज सकाळीसुद्धा गणेशपेठ पोलिसांनी माहिती कक्षाला याबाबतची माहिती देण्याचे टाळले. प्रकरण सीआयडीकडे प्रकरण वरिष्ठांच्या कानावर गेल्यामुळे डीसीपी निर्मला देवी, एसीपी भगत यांनी रात्रीच गणेशपेठ पोलिसांकडून वास्तव जाणून घेतले. प्रकरण ‘कस्टडी डेथ’चे असूनही रात्रीपर्यंत सीआयडी अधिकाऱ्यांना कळविण्यात आले नाही. बोभाटा झाल्याचे लक्षात आल्यामुळे आज सीआयडीचे इन्स्पेक्टर माधव गिरी यांना माहिती आणि नंतर प्रकरणाची कागदपत्रे सोपविण्यात आली.डीसीपी निर्मलादेवीसचिनला मिरगी(फिट)चा आजार होता. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्याला मारहाण झाली की नाही, कुणी मारहाण केली, ते उघड झाले नाही. तो कोमात असल्यामुळे त्याच्याकडून कोणतीही माहिती घेता आली नाही. मात्र, प्रकरण गंभीर आहे. त्याची सीआयडीकडून चौकशी केली जाणार आहे. जो कुणी दोषी असेल, ते स्पष्ट होईल.