लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका महिला ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या ग्रीनलॅन्ड रियल्टीजला जोरदार दणका दिला आहे. तक्रारकर्त्या ग्राहकाचे दोन लाख रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश ग्रीनलॅन्डचे भागीदार अरुण निमजे व नीलेश मेट्टेवार यांना देण्यात आला आहे. या रकमेवर १६ सप्टेंबर २०११ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार अशी एकूण ६० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.डॉ. मुग्धा गोरसे असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून त्या नागपूर येथील रहिवासी आहेत. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी वरील निर्णय देऊन गोरसे यांना दिलासा दिला. ग्रीनलॅन्ड रियल्टीजला या निर्णयाचे पालन करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तक्रारीतील माहितीनुसार, गोरसे यांनी ग्रीनलॅन्डच्या मौजा दिघोरी येथील सान्वी पॅलेस योजनेतील एक गाळा १० लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी ६ सप्टेंबर २०११ रोजी करार केला होता. दरम्यान, ग्रीनलॅन्डला अग्रिम म्हणून १ लाख ३० हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर गोरसे यांनी ग्रीनलॅन्डला पुन्हा एक लाख रुपये दिले. त्यावेळी २० ऑगस्ट २०१२ पर्यंत गाळ्याचे विक्रीपत्र करण्याचे व त्यानंतर तीन महिन्यात गोरसे यांना गाळ्याचा ताबा देण्याचे ठरले होते. त्यानंतर ग्रीनलॅन्डने ही योजना दुसऱ्या व्यक्तीला विकली व गोरसे यांना त्यांची रक्कम परत केली नाही. गोरसे यांनी वारंवार विनंती करूनदेखील त्यांना रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी ग्रीनलॅन्डविरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तसेच, त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक मंचातही तक्रार दाखल केली होती. मंचने विविध बाबी लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे निर्णय दिला.दोन लाखाचेच पुरावे सादरगोरसे यांनी ग्रीनलॅन्डला २ लाख ३० हजार रुपये अदा केल्याचे तक्रारीत म्हटले होते. परंतु, त्यांना केवळ दोन लाख रुपयांचेच पुरावे मंचासमक्ष सादर करता आले. त्यामुळे मंचने गोरसे यांना दोन लाख रुपये व त्यावर १८ टक्के व्याज अदा करण्याचा आदेश दिला.
ग्रीनलॅन्ड रियल्टीजला ग्राहक मंचचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 1:24 AM
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका महिला ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या ग्रीनलॅन्ड रियल्टीजला जोरदार दणका दिला आहे. तक्रारकर्त्या ग्राहकाचे दोन लाख रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश ग्रीनलॅन्डचे भागीदार अरुण निमजे व नीलेश मेट्टेवार यांना देण्यात आला आहे. या रकमेवर १६ सप्टेंबर २०११ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार अशी एकूण ६० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
ठळक मुद्देग्राहकाला ६० हजार रुपये भरपाई : दोन लाख रुपये व्याजासह देण्याचा आदेश