- जयदीप दास, पर्यावरणप्रेमी
आयएमएस प्रकल्पाची पर्यावरणीय व्यवहार्यता काय, हे अद्याप एनएचएआयने स्पष्ट केले नाही. आयएमएस झाल्यानंतर किती कार्बन उत्सर्जन थांबविण्याची याेजना काय, ऑक्सिजनचे नुकसान कसे भरून काढणार, कम्पेनसेटरी वृक्षाराेपणासाठी काय याेजना केली, याची उत्तरे एनएचएआयला द्यावी लागतील.
- काैस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हीजील
आयएमएस इमारतीच्या कामाची जागा बदलल्याने झाडांची संख्या कमी झाली आहे. आता जाहिरात दिली आहे. तक्रारी आल्यानंतर सुनावणी घेण्यात येईल व नंतरच परवानगी देण्यात येईल.
- अमाेल चाैरपगार, उद्यान अधीक्षक, मनपा
पीकेव्हीच्या जागेवर करू वृक्षाराेपण
वृक्षताेडीसाठी दिलेल्या अर्जानुसार मनपाने प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिकांच्या पुनर्वसनाच्या जागेतील झाडांना वगळण्यात आल्याने झाडांची संख्या कमी झाली आहे. परवानगी मिळाल्यानंतरच काम सुरू करण्यात येईल. पर्यावरण व्यवस्थापन याेजनेचा आराखडा रेल्वेकडे सादर केला आहे. कृषी विद्यापीठाने अमरावती राेडवरील त्यांच्या जागेवर वृक्षाराेपणाचे प्रपाेजल मनपाला दिले आहे. त्या जागेवर १४ हजार झाडे लावण्यात येतील.
- अभिजित जिचकार, प्रकल्प संचालक, एनएचएआय