शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सायबर टोळीचे आमिष पाच लाखांचे तर गंडा साडेआठ लाखांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 7:10 PM

पाच लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने एका महिलेला ८ लाख, ५२ हजारांचा गंडा घातला.

ठळक मुद्देदिल्लीहून येत होते सर्व फोनसलग तीन वर्ष गंडवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने एका महिलेला ८ लाख, ५२ हजारांचा गंडा घातला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१४ ते २०१७ या कालावधीत ही फसवणुकीची घटना घडली. प्रमोदिता अजय रामटेके (वय ५२) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या सेमिनरी हिल्समधील गजानन प्रसाद सोसायटीत राहतात. २१ डिसेंबर २०१४ ला दुपारी १२ च्या सुमारास त्यांना एका आरोपीचा फोन आला. त्याने त्याचे नाव संजयसिंग (दिल्ली) सांगितले.९८९११ २९६९१ या मोबाईल नंबरवरून बोलणाऱ्या आरोपीने रिलायन्सची पॉलिसी २९,५०० रुपयात काढल्यास तातडीने पाच लाखांचे कर्ज मिळेल. पॉलिसीचा जो अवधी राहील, तेवढ्याच अवधीत तुम्ही थोडे थोडे करून कर्जाचे हप्ते भरू शकता, असे आरोपी म्हणाले. त्यामुळे रामटेके यांनी लगेच आरोपीने सांगितलेल्या खात्यात २९,५०० रुपये जमा केले. त्याने तशी पॉलिसीची कागदपत्रे रामटेके यांना पाठविली. यानंतर कर्जासाठी अर्ज केला असता आरोपीने टॅक्स जमा करून म्हणून ४८,९९९ रुपये जमा करायला लावले. पुढे याच संजयसिंग नामक आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून ९७१८४८ ३१४८या क्रमांकावरून तर नंतर त्याचे साथीदार अजित जोशी, मनीष म्हलोत्राने ९७१८४८ ३१४८, नेहा शर्मा हिने ९६४३२७१०१८, दत्तूप्रसाद पाठक याने ९१३६२३३४८१६ शोभीत राय ८४४७५९०५८१, फजिल शर्मा ८४५९९५९६९५८, पराग राव, अभिषेक वर्मा ८४५९४८ ७३६५, अंजली मेहरा हिने ७८३६०२१८१९, ८५१०८००२६२, नागपालने ९५६०८४११०६, विजय भारद्वाजने ७८३६०३३६८९ नसिम सिद्धीकी आणि त्याचा एक साथीदार अशा एकूण १४ जणांनी (सर्व रा. दिल्ली) २०१४ ते जून २०१७ पर्यंत वेळोवेळी फोन केले. प्रत्येकवेळी ते कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी वेगवेगळी सबब सांगून रक्कम जमा करायला सांगत होते. तर आपण एवढी रक्कम जमा केली. ती परत मिळेल, या आशेने रामटेके आरोपीने सांगितलेल्या खात्यात रक्कम जमा करीत होत्या. एकूण ८ लाख, ५२ हजार, ८९३ रुपये जमा करूनही आरोपी पुन्हा पैसे भरा असेच सांगत होते. अखेर रामटेकेंनी रक्कम जमा करण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला.सहा महिन्यानंतर गुन्हा दाखलआपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रामटेके नोव्हेंबर २०१७ मध्ये गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेल्या. गिट्टीखदान पोलिसांनी त्यांना सीताबर्डी ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. त्या सीताबर्डीत पोहचल्या. ठाणेदार हेमंत खराबे आणि त्यांचे सहकारी पीएसआय कविकांत चौधरी यांनी रामटेकेंची कैफियत ऐकून त्यांना व्यवस्थित तक्रार अर्ज लिहून देण्यास तसेच फसवणुकीचे सर्व पुरावे एकत्र जोडून देण्यास मदत केली. नंतर प्रकरण गिट्टीखदान ठाण्यात पाठविले. येथे पीएसआय मुकेश राठोड यांनी बरेच दिवस चौकशी केल्यानंतर या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम