शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सायबर गुन्हेगाराने नागपुरात घातला बँकेला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:45 AM

शहरातील एक प्रतिष्ठित कार वितरक बोलतो, असे सांगून एका ठगबाजाने स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाकडून ५ लाख, ५६ हजार रुपयांची रक्कम उत्तर प्रदेशातील एका बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतली.

ठळक मुद्देबनावट मेल पाठवले साडेपाच लाख उत्तर प्रदेशात ट्रान्सफर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील एक प्रतिष्ठित कार वितरक बोलतो, असे सांगून एका ठगबाजाने स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाकडून ५ लाख, ५६ हजार रुपयांची रक्कम उत्तर प्रदेशातील एका बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतली. मंगळवारी २० नोव्हेंबरला ही बनवाबनवी घडली. ते लक्षात आल्यानंतर बँक व्यवस्थापकांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.स्टेट बँकेच्या सोमलवाडा शाखेत मंगळवारी बँकेचे सेवा व्यवस्थापक अनिल भगवान भालेराव कार्यरत असताना दुपारी १२.१६ वाजता त्यांना ९७५८८२९५५४ वरून फोन आला. आपण बरबटे नेक्सा कार शोरूममधून संचालक बोलतो. मला तात्काळ माझ्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीला रक्कम पाठवायची आहे, असे तो म्हणाला. भालेराव यांनी फोनवरून रक्कम वळती करण्यास नकार दिला असता आरोपीने त्यांना खाते बंद करून वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी दिली.बरबटे यांचा बँकेतील मोठा आर्थिक व्यवहार बघता भालेराव दडपणात आले. त्यांनी त्याला मेल करण्यास सांगितले. त्यानुसार, ठगबाजाने बरबटे यांच्या बनावट आयडीचा वापर करून बँक व्यवस्थापकाला मेल पाठवला. आरोपीने आपली ओळख लपवित ५ लाख, ५५ हजार, ९६० रुपयांची रक्कम अंकुर जिंदल यांच्या नावे उत्तर प्रदेशातील कापोर्रेशन बँकेच्या खात्यात जमा करायला सांगितले. त्यानुसार, भालेराव यांनी ती रक्कम ट्रान्सफर केली.

पुन्हा पाठवले मेलया व्यवहारानंतर भालेराव यांना पुन्हा काही मेल आरोपीने पाठवले आणि नवनवीन खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यामुळे भालेराव यांना संशय आला. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांनी या व्यवहाराची माहिती बरबटे यांना कळविली. बरबटे यांनी आपण भालेराव यांना फोन अथवा मेल केल्याचा स्पष्ट इन्कार केला. त्यामुळे ठगबाजाने बँकेला गंडा घातल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. बँक व्यवस्थापक संदीप बाबाराव हजारे (वय ३२, रा. श्री नगर, मानकापूर) यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम