शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

नागपुरातील घरांच्या सर्वेक्षणासाठी सायबरटेकला पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:07 PM

घरोघरी जाऊन शहरातील घरांचा डाटा संकलित करण्याची जबाबदारी मे. सायबरटेक सिस्टीम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीवर सोपविण्यात आली.

ठळक मुद्देमनपा स्थायी समितीकडे प्रस्ताव : २०१८ पर्यंत डाटा संकलित करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरोघरी जाऊन शहरातील घरांचा डाटा संकलित करण्याची जबाबदारी मे. सायबरटेक सिस्टीम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीवर सोपविण्यात आली. परंतु डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतरही शहरातील ५८ टक्के घरांचाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. उर्वरित ४२ टक्के घरांचे सर्वेक्षण करून डाटा संकलित करण्यासाठी या कंपनीला पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव कर व कर आकारणी विभागाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. कंपनीच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानंतरही या कंपनीला पुन्हा मुदतवाढ देण्याचा विचार आहे. शुक्र वारी समितीच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.सायबरटेक कंपनीवर शहरातील ६ लाख मालमत्तांचा डाटा संकलित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यासाठी प्रती युनिट १२० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. कंपनीने ३ लाख ४८ हजार घरांचा डाटा संकलित केला तर २ लाख ५२ हजार घरांचे सर्वेक्षण शिल्लक आहे. सायबरटेक कंपनीला वर्षभरापूर्वी सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. आॅक्टोबर २०१७ पर्यत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या कालावधीत ५० टक्केही काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे या कंपनीला डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही सर्वेक्षण पूर्ण करण्यात यश मिळाले नाही. त्यानंतरही या कंपनीला मुदतवाढ देण्याचा विचार आहे.प्रस्तावात सायबरटेक कंपनीला मुतदवाढ देऊ न ३१ मार्चपर्यंत ४२ टक्के घरांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात यावे. यासाठी कंपनीने मनुष्यबळ वाढवून मुदतीत काम करणे अपेक्षित आहे. सोबतच या कामाची निविदा प्रक्रिया राबविताना ज्या एजन्सींनी यात सहभाग घेतला होता व यासाठी पात्र ठरल्या होत्या. त्यांना विचारणा करून डाटा संकलनाचे काम देणे, तसेच सहभाग न घेतलेल्या एजन्सींनाही काम देण्याचा विचार आहे.अर्धवट व चुकीच्या सर्वेक्षणात सुधारणा न करता झोन कार्यालयांनी चुकीचा डाटा अपलोड केला. यामुळे मालमत्ताधारकांना अव्वाच्या सव्वा डिमांड पाठविण्यात आल्याने नागरिकांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. याचा विचार करता नगरसेवकांनी चुकीचा सर्वे रद्द करण्याची मागणी केली होती. अखेर सभागृहात दुपटीपेक्षा अधिक कर न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एकाच वेळी एकाहून अधिक एजन्सीची नियुक्ती करून मार्च संपण्यापूर्वी सर्वेक्षण पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र गेल्या ३७ दिवसापासून शहरातील घरांचा सर्वे करण्याचे काम ठप्प आहे.एक घर एक युनिटवर निर्णयसायबरटेक कंपनीला एक घर एक युनिट यानुसार सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र नंतर यात सुधारणा करून एका घरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे स्वतंत्र युनिट गृहीत धरून नोंदी करण्यात आल्या. युनिट वाढल्याने सायबरटेक कंपनीला अधिक रक्कम द्यावी लागली. शिल्लक घरांचे सर्वेक्षण करताना युनिट गृहीत धरण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.सामान्य कर जैसे थेकर व कर आकारणी विभाग २०१८-१९ या वर्षात मालमत्ताकरांतर्गत आकारावयाच्या प्रस्तावित करात कोणतीही वाढ करणार नाही. सामान्य कर, मलजल कर, मलजल लाभ कर, पाणीपट्टी कर, पाणी लाभ कर, अग्निशमन कर, दिवाबत्ती कर, पथकर, वृक्षकर यात कोणत्याही स्वरुपाची वाढ प्रस्तावित नाही. २०१७-१८ या वर्षातील दर कायम ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाHomeघर