शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

निर्बंध उठताच उत्साहात साजरा झाला सायकल दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:07 AM

नागपूर : वेगवेगळ्या क्षमतेच्या आधुनिक माेटरसायकल व चारचाकी वाहनांच्या आक्रमणाने अडगळीत पडलेल्या सायकल्सना आता चांगले दिवस आले आहेत. काेराेना ...

नागपूर : वेगवेगळ्या क्षमतेच्या आधुनिक माेटरसायकल व चारचाकी वाहनांच्या आक्रमणाने अडगळीत पडलेल्या सायकल्सना आता चांगले दिवस आले आहेत. काेराेना काळात राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यासह फिटनेस आणि फॅशनचा पर्याय ठरलेली सायकल बहुतेकांच्या जीवनाचा भाग झाली आहे. दरम्यान, लाॅकडाऊनमुळे निर्बंध असल्याने सर्वांची सायकल राइड खाेळंबली हाेती. मात्र निर्बंध उठताच गुरुवारी सर्वांनी सायकल रायडिंगचा मनसाेक्त आनंद लुटला. यावेळी लाेकमतला प्रतिक्रिया देताना नियमित सायकलस्वारांकडून सायकलिंगमुळे मिळालेल्या आराेग्यदायी परिवर्तनाच्या कथा ऐकायला मिळाल्या.

सायकलने सहाच महिन्यांत ३५ किलाे वजन केले कमी : दीपांती पाल

नागपूरच्या सायकल मेयर दीपांती पाल यांनी सायकलमुळे त्यांच्या जीवनात आलेल्या बदलाची कहानी सांगितली. लहानपणापासून खेळाडू म्हणूनच राहिले हाेते; पण महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाच्या दबावामुळे खेळणे मागे पडत गेले आणि वजन वाढत गेले. वजन ९२ किलाेपर्यंत वाढले हाेते. या काळात वर्धाराेडवरील एका शैक्षणिक संस्थेत नाेकरी मिळाली. ऑफिस घरापासून २५ किमी अंतरावर हाेते. त्यावेळी मी सायकलने जाण्याचा निर्धार केला. जाण्या-येण्यात ५० किमीचा प्रवास राेजचा. आश्चर्य म्हणजे पाच-सहा महिन्यांतच वजन ३५ किलाेने कमी झाले. ऑफिसमध्ये सायकलने प्रवास करताना त्यांचे मन सायकल रायडिंगकडे वळले आणि प्राेफेशनल सायकल रायडर म्हणून त्यांचा हा प्रवास सुरू झाला. २०१८ मध्ये एका आंतरराष्ट्रीय एकल इव्हेंटमध्ये सहभागी हाेत ठराविक वेळात २००, ३००, ४०० व ६०० किमी सायकल चालविण्याचा विक्रम केला. सायकलविषयी जनजागृती करण्यासाठी त्या करीत असलेल्या कार्याचा सन्मान म्हणून आंतरराष्ट्रीय संघटनेने त्यांना बायसिकल मेयर म्हणून गाैरविले आहे. सायकल ही जीवनाचा भाग व्हावी, नागरिकांनी ऑफिसमध्ये दरराेज किंवा आठवड्यातून एकदा तरी सायकलने प्रवास करावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दैनंदिन कामाचा ताण कमी झाला : संजय धाेटे

संजय धाेटे हे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून सेवारत आहेत. काेराेनाच्या प्रकाेपामुळे राेजचे वाॅकिंग बंद झाल्याने राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी म्हणून त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच सायकलिंग सुरू केले. १०-१५ सहकाऱ्यांसाेबत राेज सकाळी ३० किमी सायकलिंग करण्याची सवयच त्यांनी लावली. विशेष म्हणजे या काळात त्यांचा लठ्ठपणा दूर हाेऊन २१ किलाे वजन घटले. ग्रुपमधील काही शुगर पेशंट सदस्यांची औषधी बंद झाली. दैनंदिन कामाचा ताण कमी झाला असून, तरतरी वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मधुमेहाचा त्रास ९० टक्के बरा : स्वप्नील बनकर

एलआयसीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत स्वप्नील बनकर यांनी सायकलिंगमुळे जीवनात आमूलाग्र बदल घडल्याची भावना व्यक्त केली. मित्राच्या सल्ल्यावरून ॲथलिट क्लब जाॅईन केला आणि सायकल रायडिंगची सवय लागली. सहा महिन्यात १२५ किमीपर्यंत सायकल चालविण्याची क्षमता वाढली. वजन घटले आणि शुगरच्या गाेळ्याही बंद करणे शक्य झाले. एक माेठे परिवर्तन अनुभवत असल्याचे सांगत प्राेफेशनल स्पर्धांमध्ये सहभागी हाेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.