शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे काँग्रेस महासचिवांच्या घरावर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 8:12 PM

तीन दरोडेखोरांनी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मुजीब पठाण यांच्या आई व पत्नीला चाकूचा धाक दाखवित त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. याच धावपळीत मुजीब पठाण यांचे धाकटे बंधू घराबाहेर पडले आणि त्यांनी त्यांच्या चुलत भावांसह इतरांना मदतीला बोलावले. दरोडेखोरांपैकी एकाने त्यांच्या डोक्यावर रॉडने वार करून त्यांना जखमी केले. मात्र, नागरिकांनी सावधगिरी बाळगत तिन्ही दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुटीबोरी येथे गुरुवारी मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देनागरिकांनी दरोडेखांना पकडले : १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन दरोडेखोरांनी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मुजीब पठाण यांच्या आई व पत्नीला चाकूचा धाक दाखवित त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. याच धावपळीत मुजीब पठाण यांचे धाकटे बंधू घराबाहेर पडले आणि त्यांनी त्यांच्या चुलत भावांसह इतरांना मदतीला बोलावले. दरोडेखोरांपैकी एकाने त्यांच्या डोक्यावर रॉडने वार करून त्यांना जखमी केले. मात्र, नागरिकांनी सावधगिरी बाळगत तिन्ही दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुटीबोरी येथे गुरुवारी मध्यरात्री घडली.प्रवीण माणिक मंजुळकर (२९, रा. पिंपळगाव, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा), मन्नूसिंह जनरलसिंह ताक (४०, रा. दुर्गापूर-नेरी, जिल्हा चंद्रपूर) व वसीमशाह गोलूशाह (२६, रा. नेर पिंगळाई, ता. मोर्शी, जिल्हा अमरावती) अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. मुजीब पठाण पक्षाच्या कामानिमित्त हिंगोलीला गेले होते. तिघांनी मध्यरात्रीनंतर लोखंडी रॉडने स्वयंपाकघराचे दार तोडून आत प्रवेश केला. त्यांनी पहिल्यांदा मुजीब पठाण यांच्या आई व वडिलांना धमकावून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर त्यांनी पठाण यांच्या पत्नीच्या खेलीत प्रवेश करीत त्यांना चाकूचा धाक दाखवित जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.दोघांनी त्यांना पहिल्या माळ्यावरील मुजीब पठाण यांच्या लहान भावाच्या खोलीत नेले. तेथील दागिने व रोख रक्कम घेऊन परत तळ मजल्यावर आले. त्यांनी घरातून पळ काढताच अकबर पठाण, कयुम पठाण यांच्यासह नागरिकांनी तिन्ही दरोडेखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांच्याकडून ११ लाख १ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख असा एकूण असा एकूण १२ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुटीबोरी येथे वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकात दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी भादंवि ३९४, ४५२, ४५९, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.अकबर पठाण जखमीया धावपळीत मुजीब पठाण यांचे लहान भाऊ अकबर पठाण हे दरोडेखोरांची नजर चुकवून बाहेर आले आणि त्यांनी त्यांच्या वामन नामक चौकरीदाराला जागे केले. शिवाय, त्यांच्या चुलत भावासह इतरांना मदतीसाठी सूचना केली. त्याचवेळी दरोडेखोर पळून जात असताना अकबर यांनी एका दरोडेखोराला पकडले. या झटापटीत दरोडेखोराने त्यांच्या डोक्यावर रॉडने प्रहार केल्याने ते जखमी झाले. त्याचवेळी कयुम पठाण (चुलत भाऊ) घटनास्थळी आले. दरोडेखोर एमएच-३५/एन-२३ क्रमांकाच्या मोटरसायकलने पळून जात असतानाच कयूम पठाण यांनी त्यांच्या कारने मोटरसायकलला धडक दिली. दरोडेखोर दुचाकी सोडून पळून जात असतानाच नागरिकांनी मोठ्या शिताफीने त्यांना पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.इनोव्हाचे टायर पळविलेआठ दिवसांपूर्वी (दि. १३) चोरट्यांनी मुजीब पठाण यांच्या एमएच-४०/एसी-२९३६ क्रमांकाच्या इनोव्हाचे दोन टायर चोरून नेले. ही इनोव्हा घराच्या ‘पोर्च’मध्ये उभी होती. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली असून, अद्यापही चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यातच ही दरोड्याची घटना घडली. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा