रामटेक : दाेन वेगवेगळ्या अपघातांत दाेघांचा मृत्यू झाला. भरधाव दुचाकी दिशादर्शक फलकावर आदळल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास रामटेक शहरातील माैदा टी-पाॅइंट परिसरात घडली. पंकज नामदेव खेकडे (२६, रा. हिवरा (हिवरी), ता. रामटेक) असे मृताचे नाव आहे. पंकज हा माैदा टी-पाॅइंटकडून नगरधनमार्गे आपल्या एमएच-४० / बीएक्स-५५७२ क्रमांकाच्या दुचाकीने जात हाेता. अशात भरधाव दुचाकी दिशादर्शक फलकावर आदळली. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दुसरी घटना रविवारी (दि. २४) कांद्री माईन रेल्वे लाइनजवळ घडली. सुमरम दादुराम कुंजाम (४२) व त्यांची पत्नी रमनवती (रा. लुंगता, बिछवा, जि. शिवनी) हे दाम्पत्य आपल्या एमएच-४० / एए-३०४१ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना एमपी-०७ / एचबी-२००१ क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यात दाम्पत्य खाली पडले. यात गंभीर जखमी झाल्याने पतीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली. या प्रकरणी रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस नाईक गजानन उकेबाेंद्रे करीत आहेत.