कळमेश्वर : घरासमाेर ठेवलेल्या विटांना आराेपीने पिकअप वाहनाने धडक देत नुकसान केले. यामुळे नुकसानभरपाई मागितल्याच्या कारणावरून नऊ आराेपींनी दाेघांना मारहाण करीत जखमी केले, शिवाय आराेपींनी अश्लील शिवीगाळही केली. ही घटना कळमेश्वर शहरातील वाॅर्ड क्र. १५ गजानन मंदिर परिसरात मंगळवारी (दि. ३०) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
गुलाब तेजबहादूर यादव (३८, रा. वाॅर्ड क्र. १५, कर्ण ले-आऊट, कळमेश्वर) असे जखमीचे नाव असून, अनिल गाैतम, प्रदीप अंदरेले, उजागरसिंग अंदरेले, बाबलसिंग अंदरेले, कालू अंदरेले, पंचमी अंदरेले, किरण अंदरेले, भुऱ्या अंदरेले व लखन अंदरेले (सर्व रा. कळमेश्वर) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. आराेपी अनिल गाैतम याने आपल्या ताब्यातील बाेलेराे पिकअप वाहनाने गुलाबच्या घरासमाेरील विटांना धडक देत विटांचे नुकसान केले. यावर गुलाबने आराेपीकडे नुकसानभरपाई मागितल्याच्या कारणावरून आराेपी अनिल गाैतम याने त्याच्या साथीदारांना गाेळा करून गुलाब व त्याच्या भावाला विटांनी मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, २९४ अन्वये गुन्हा नाेंदवून नऊ आराेपींना अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे करीत आहेत.