लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर शहरातील वस्त्यांत सर्वेक्षण सुरू आहे. महापालिका कर्मचारी व शिक्षक दररोज प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन कुणी आजारी आहे का; ताप, सर्दी, खोकला आहे का, याबाबत विचारणा करून नोंदी घेताहेत. कोविड -१९ चे हॉटस्पॉट ठरलेल्या भागातील नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसताच आरोग्य विभागाला माहिती देणे अपेक्षित आहे; परंतु नागरिक स्तत:हून माहिती देण्यासाठी पुढे येत नाहीत. याचा विचार करता मनपाच्या आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण सुरू आहे. सर्व्हे करणाऱ्या प्रत्येक कर्मचाºयावर ५० घरांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्व्हेदरम्यान कोविड-१९ ची लक्षणे दिसून आल्यास अशा नागरिकांना तात्काळ क्वारंटाईन केले जात आहे. नागपुरात सुरुवातीला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनअंतर्गत येणाºया सुमारे ५० हजार कुटुंबांतील दोन लाख लोकांचा मनपाने सर्व्हे केला. त्यानंतर शहरातील सर्वच झोनमध्ये सर्व्हे करण्यात आला. यात कु टुंबातील सदस्यांची माहिती, आजार व कुणी बाहेरगावाहून आले आहे का, यांची माहिती संकलित करण्यात आली.बाधित रुग्ण आढळून आलेल्या वस्त्यासतरंजीपुरा, मोमिनपुरा, शांतिनगर, खामला, जरीपटका, राजीवनगर, बजाजनगर, अभ्यंकरनगर, एम्प्रेस सिटी, भालदारपुरा, कुंदनलाल गुप्ता नगर, गिट्टीखदान, कमाल चौक व टिमकी.तीन हजारांहून अधिक कर्मचारीकोरोनाविषयक माहिती, जनजागृती आणि शहरातील नागरिकांच्या आरोग्याविषयीची माहिती सर्व्हेच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे. यातून गंभीर आजार असणाऱ्यांची संख्या, वृद्ध, फोन क्रमांक अशी माहिती संकलित करण्यात आली. हॉटस्पॉट ठरलेल्या भागातील नागरिक स्वत:हून माहिती देण्यासाठी पुढे येत नसल्याने या भागात फेरसर्व्हे सुरू आहे. यात मनपातील तीन हजार कर्मचारी व शिक्षकांचा समावेश आहे.
नागपुरात हॉटस्पॉट ठरलेल्या भागात प्रत्येक कुुटुंबाचा दररोज सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 5:29 PM
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर शहरातील वस्त्यांत सर्वेक्षण सुरू आहे. महापालिका कर्मचारी व शिक्षक दररोज प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन कुणी आजारी आहे का; ताप, सर्दी, खोकला आहे का, याबाबत विचारणा करून नोंदी घेताहेत.
ठळक मुद्देसलग १४ दिवस नोंदी मनपा कर्मचारी व शिक्षक घरोघरी जाऊन घेताहेत माहिती