लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘दलित’ हा शब्द रुढ झालेला आहे. तो वापरातच आणू नका, ही भावना बरोबर नाही. दलित हा अपमानास्पद शब्द नाही तर तो ऊर्जा वाढवणारा शब्द आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आपण पक्षाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितल.आठवले म्हणाले, दलित या शब्दाने आंबेडकरी कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते. तो शब्द अपमानास्पद आहे, असे म्हणणे बरोबर होणार नाही. दलित पॅन्थर नावाची संघटना आम्ही स्थापन केली होती. तेव्हा आमचा उद्देश हा होता की, जे सामजिक, आर्थिक आणि सर्वच दृष्टीने मागासलेला आहे तो. तेव्हा त्या शब्दाचा वापर न करणे असे म्हणणे बरोबर नाही.एससी, एसटी अॅक्टच्या विरोधात भारत बंद संबंधात ते म्हणाले की, जे अन्याय करतात त्यांच्यावरच कारवाई होईल, जे अन्याय करणार नाही, त्यांना घाबरण्याची गरज नाही. दुरुपयोग होऊ नये, याची आम्हीही काळजी घेऊ परंतु यात कायद्यात बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रिपाइंच्या एकीकरणाच्या मुद्यावर त्यांना छेडले असता नेत्यांच्या ऐक्यापेक्षा जनतेचे ऐक्य महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.२०१९ च्या निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वात २४० जागा जिंकू असा दावा करीत रिपाइंतर्फे लोकसभेसाठी सातारा आणि दक्षिण-मध्य मुंबई या दोन जागा मागण्यात येतील. यापैकी दक्षिण-मध्य मुंबईतून आपण स्वत: लढणार असल्याचेही आठवले यांनी जाहीर कले. साताराची जागा न मिळाल्यास विदर्भातील कुठलही एक जागा मागू, असेही ते म्हणाले.येत्या ३ आॅक्टोबरला रिपाइंचा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार असून मुखयमंत्र्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, अनिल गोंडाणे, महेंद्र मानकर, राजन वाघमारे, बाळू घरडे, प्रा. पवन गजभिये, विनोद थुल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
‘दलित’ अपमानास्पद नव्हे ऊर्जावान शब्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 8:27 PM
‘दलित’ हा शब्द रुढ झालेला आहे. तो वापरातच आणू नका, ही भावना बरोबर नाही. दलित हा अपमानास्पद शब्द नाही तर तो ऊर्जा वाढवणारा शब्द आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आपण पक्षाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितल.
ठळक मुद्देरामदास आठवले : न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करणार