लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात काही वर्षांपासून दलितांसाठी नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दलितांचे सर्वच पातळींवर नियोजनबद्ध पद्धतीने खच्चीकरणाचा प्रकार सुरू असून आता तर राज्यघटनेलाच बदलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संविधानाला व दलित समाजाला केवळ काँग्रेसपासूनच संरक्षण मिळू शकते. त्यामुळे राज्यातील दलित तरुणांचे नेतृत्व काँग्रेससोबत जोडण्याचे पूर्ण प्रयत्न राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य व राज्याचे माजी प्रधान सचिव उत्तम खोब्रागडे यांनी दिली. सोमवारी खोब्रागडे यांनी लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चेदरम्यान त्यांनी राज्यातील निवडणुकांसंदर्भातील धोरण, बहुजन नेतृत्व तसेच राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका मांडली.आपल्या देशात लोकशाहीचे मूळ संकेतच धोक्यात आले आहे. रोहित वेमुला, गुना इत्यादी प्रकरणे पाहिली तर दलितांना गुलाम बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. हे प्रकार थांबविण्याची मानसिकता आणि क्षमता केवळ काँग्रेस पक्षात आहे. काँग्रेस पक्ष आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत आहे. त्यामुळे दलित तरुण जास्तीत जास्त प्रमाणात काँग्रेसशी जुळला पाहिजे हेच समाजाच्या हिताचे आहे, असे खोब्रागडे म्हणाले.प्रकाश आंबेडकरांसह समविचारी पक्षांना जोडणारउत्तर प्रदेशात मायावती यांनी सपासोबत आघाडी करून अतिशय समजूतदारीची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातदेखील याची आवश्यकता आहे. राज्यात दलित मतांचे विभाजन होते आणि त्याचा फायदा दलितविरोधी शक्तींना मिळतो. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाची वेगळी ताकद आहे. त्यांच्यासह सपा, बसपा यासारखे समविचारी पक्ष एकत्र येणे हे दलित समाज व राज्यासाठी भल्याचे ठरणार आहे. या सर्वांना जोडण्यासाठी काँग्रेसतर्फे पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील सुरू झाले आहेत, असे उत्तम खोब्रागडे म्हणाले.रामदास आठवलेंनी भ्रमनिरास केलासेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळेल यासाठी रामदास आठवले यांचे निमंत्रण स्वीकारले व ‘रिपाइं’शी जुळलो. परंतु प्रत्यक्षात रोहित वेमुलासह दलित अत्याचाराच्या विरोधात आठवले यांनी शब्दही काढला नाही. नोटाबंदीच्या वेळी दलित, शोषित अडचणीत सापडला. मात्र त्यावेळीदेखील त्यांनी मौन ठेवले. त्यांना केवळ आपल्या खुर्ची टिकवायची आहे. दलितांच्या नावावर ‘रिपाइं’ची दुकानदारीच सुरू आहे. प्रत्यक्षात दलितांशी त्यांना काहीच घेणेदेणे नाही, असा घणाघाती प्रहार उत्तम खोब्रागडे यांनी केला.सुस्थापितांनी आरक्षण नाकारावेदलित समाज मुख्य प्रवाहात यावा, यासाठी आरक्षण लागू करण्यात आले होते. अजूनही अनेकांना आरक्षणाच्या लाभाची आवश्यकता आहे. परंतु जे दलित सुस्थापित झाले आहेत, त्यांनी आरक्षण नाकारण्यासंदर्भात सामाजिक पुढाकार घेतला पाहिजे, असे उत्तम खोब्रागडे म्हणाले.‘ईव्हीएम’बाबत लोकांच्या शंकांचे निरसन व्हावेदेशात नि:पक्ष व पारदर्शी निवडणुका व्हाव्यात ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. देशातील अनेक लोकांना ‘ईव्हीएम’बाबत सांशकता आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने जनतेच्या शंकांचे निरसन करायला हवे. शासन व निवडणूक आयोग लोकांचे म्हणणे ऐकत नसतील तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएम मशीनवरच बहिष्कार घालावा. ‘ईव्हीएम’ असेल तर आम्ही निवडणूकच लढणार नाही, अशी भूमिका सर्व विरोधी पक्षांनी घेतली पाहिजे, असे खोब्रागडे म्हणाले.
दलित तरुण नेतृत्व काँग्रेससोबत जोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:29 PM
देशात काही वर्षांपासून दलितांसाठी नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दलितांचे सर्वच पातळींवर नियोजनबद्ध पद्धतीने खच्चीकरणाचा प्रकार सुरू असून आता तर राज्यघटनेलाच बदलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संविधानाला व दलित समाजाला केवळ काँग्रेसपासूनच संरक्षण मिळू शकते. त्यामुळे राज्यातील दलित तरुणांचे नेतृत्व काँग्रेससोबत जोडण्याचे पूर्ण प्रयत्न राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य व राज्याचे माजी प्रधान सचिव उत्तम खोब्रागडे यांनी दिली.
ठळक मुद्देउत्तम खोब्रागडे : ‘ईव्हीएम’वर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालावा