लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपली बस प्रकल्पांतर्गत शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची शहर बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पाच ऑपरेटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या इन्टीग्रेटेड मल्टी मॉडेल ट्रान्झिट सिस्टम( डिम्टस्)कंपनी अपयशी ठरली आहे. करारातील तरतुदीनुसार बसची साफससफाई, सुरळीत बससेवा, कंडक्टरची भरती अपेक्षित होती. परंतु करारानुसार उत्तम दर्जाची बससेवा देण्यात अपयश आले आहे. यामुळे या कंपनीवर दंड आकारून वसूल केला जाणार आहे.गेल्या वर्षभरात बस कंडक्टर व चालकांनी अनेकदा संप पुकारले. कंडक्टरची नियुक्ती करण्याचा अधिकार असलेल्या डिम्टस् कंपनीला यावर वेळीच तोडगा काढण्यात अपयश आले. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले. गरजेनुसार कं डक्टरचा पुरवठा झाला नाही. बसेसची स्वच्छता नियमित होत नाही. नादुरुस्त बसचे प्रमाणही वाढले आहे. यासाठी दंड आकारण्यात आला आहे. तो योग्य की अयोग्य यासाठी समिती गठित केली जाणार असल्याची माहिती परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी दिली.परिवहन विभागाला वर्षभरात जवळपास ८० कोटीचा तोटा आहे. हा तोटा कमी करण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत वाढ करावी लागणार आहे. करारातही याचा समावेश आहे, सोबतच शहरात ४८७ बस संचालन करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ३२७ बसेस रस्त्यावर धावतात. यातील काही बसेस नादुरुस्त आहेत. ४८७ बसमधून दररोज १.५० प्रवाशांनी प्रवास न केल्यास तसेच बसची योग्य देखभाल न झाल्यास दंड आकारण्याची तरतूद असल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली. त्यानुसार डिम्टस्वर २.८८ कोटींचा दंड आकारण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.प्रवाशांची संख्या वाढली नाही४८७ बसमधून दररोज १.५० लाख लोकांनी प्रवास करणे अपेक्षित होते. मात्र प्रवाशांची संख्या कमी आहे. परंतु प्रवासी संख्या कमी असल्याला जबाबदार धरताना एका बसमधून किती प्रवासी अपेक्षित होते त्यानुसार सुरू असलेल्या ३२७ बस मधून अपेक्षित प्रवासी प्रवास करीत नसल्याने डिम्टस्ला दंड आकारला जाणार आहे. जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला आहे. समितीच्या सूचनेनुसार दंड आकारला जाणार आहे.बसेस स्वच्छ नसल्यास दंडपरिवहन सेवेतील बसेस स्वच्छ ठेण्याची जबाबदारी डिम्टस् कंपनीवर आहे. परंतु डेपोच्या ठिकाणी डांबरीकरण वा खडीकरण नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात बसेस चिखलामुळे अस्वच्छ होतात. डेपोसाठी जागा उपलब्ध न होणे, इस्त्रो खाते न उघडणे यासाठी महापालिका जबाबदार आहे. दंड आकारताना अशा बाबी विचारात घेतल्या जातील.
‘डिम्टस्’कडून दंड आकारला जाणार : परिवहन सेवेत सुधारणा करण्यात नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 11:14 PM
आपली बस प्रकल्पांतर्गत शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची शहर बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पाच ऑपरेटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या इन्टीग्रेटेड मल्टी मॉडेल ट्रान्झिट सिस्टम( डिम्टस्)कंपनी अपयशी ठरली आहे. करारातील तरतुदीनुसार बसची साफससफाई, सुरळीत बससेवा, कंडक्टरची भरती अपेक्षित होती. परंतु करारानुसार उत्तम दर्जाची बससेवा देण्यात अपयश आले आहे. यामुळे या कंपनीवर दंड आकारून वसूल केला जाणार आहे.
ठळक मुद्देचौकशीसाठी समिती गठित करण्याचा निर्णय