शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

नागपूर विभागातील धरणे कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:49 PM

आॅगस्ट महिना सुरू होऊन तीन आठवडे होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. परंतु यावर्षी १ ते १७ आॅगस्टपर्यंत केवळ ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, ही परिस्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकेवळ ३५.१३ टक्के साठा :उन्हाळ्यात पाणी टंचाईची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅगस्ट महिना सुरू होऊन तीन आठवडे होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. परंतु यावर्षी १ ते १७ आॅगस्टपर्यंत केवळ ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, ही परिस्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये १८ आॅगस्ट रोजी केवळ ३५.१३ टक्के इतकाच जलसाठा आहे. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी असून यात आजच्या तारखेला (१८ आॅगस्ट) १२४८.५४ दलघमी (३५.१३ टक्के) इतकाच पाणीसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाची पाणीसाठा क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात २०७.१५ दलघमी म्हणजे २०.३७ टक्के इतका पाणीसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ४०.५२ टक्के, रामटेकमध्ये ३१.३६ टक्के, लोवर नांद वणा ७३.६३ टक्के, वडगाव ६०.४४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ४८.२५ टक्के, सिरपूर ४२.६० टक्के, पुजारी टोला ८१.३२ टक्के, कालिसरार ८२.२१ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- ३२.१७ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा १०० टक्के, गडचिरोली जिल्ह्यातील दिना ८०.५२ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २९.९३ टक्के, धाम ३३.७९ टक्के, पोथरा १०० टक्के, लोअर वर्धा टप्पा १- २६.७४ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - ३२.६१ आणि बावनथडी १८.४२ टक्के इतका पाणीसाठा आहे.पोथरा- असोलामेंढा हाऊसफुल्लविभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प आमि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प १०० टक्के भरले आहे. परंतु या दोन्ही प्रकल्पांचा एकूण साठा कमी आहे. पोथराची क्षमता केवळ ३५ दलघमी तर असोलामेंढा ५२.३३ दलघमी इतका साठा आहे.येत्या दिवसात धरणे भरण्याची शक्यताजलसंपदा विभागाने जारी केलेल्या एकूण पाणीसाठ्याच्या माहितीनुसार गेल्या वर्षी आजच्याच तारखेचा एकूण पाणीसाठा पाहिला तर तो केवळ २२.६७ टक्के इतकाच होता. तेव्हा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक असल्याने येत्या दिवसात धरणे भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसे झाले नाही तर उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.आॅगस्टमध्ये केवळ ४४.९ मिमी पाऊसआॅगस्टमध्ये नागपुरात सरासरी २६७ मिमी पाऊस होतो. परंतु यावर्षी १ ते १७ आॅगस्टपर्यंत केवळ ४४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ३१ जुलैपर्यंत नागपुरात एकूण ८९९.२ मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात सरासरी २६७ मिमी इतका पाऊस होतो. ४ आॅगस्ट १९७८ रोजी नागपुरात एकाच दिवशी २१५.४ मिमी पाऊस झाला. तो आॅगस्ट महिन्यात २४ तासात पडलेल्या पावसाचा रेकॉर्ड आहे.

टॅग्स :Damधरणnagpurनागपूर