लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आमिर खानच्या गाजलेल्या दंगल चित्रपटातील गीता-बबिता आपल्या डावपेचाच्या बळावर जशा पुरुष कुस्तीपटूंना धूळ चारतात तशीच ‘धाकड’ कुस्तीपटू आपल्या नागपुरातही आहे. काजल बाळबुधे असे तिचे नाव. राज्यस्तरावर कुस्तीपटू म्हणून अतिशय वेगाने तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु गरिबीचे शुक्लकाष्ठ मात्र तिच्या यशाच्या मार्गात मोठा अडथळा ठरत आहे. परिस्थितीमुळे अपेक्षित शिक्षण ती घेऊ शकली नाही. मात्र खेळातून चमकदार कामगिरी करून कुटुंबाचा आधार तिला व्हायचे आहे. तिच्या या स्वप्नांना आर्थिक बळाचे पंख हवे आहेत. सोनबाजीनगर, पारडी, भंडारा रोड येथे राहणारी काजल सुनील बाळबुधे कुस्तीपटू म्हणून चांगली कामगिरी बजावत आहे. काजलला वडील नाहीत. आई टेलरिंग व मेसचे काम करून कुटुंब चालवित आहे. दोन मुली एक मुलगा त्यांचे पोट भरेल इतकीच तिची मिळकत आहे. अशाही परिस्थितीत काजलने दोन वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्य व विदर्भ केसरीचा पुरस्कार पटकाविला आहे. पहाटे ५ ला उठून काजल पारडीवरून सायकलने यशवंत स्टेडियममध्ये सरावासाठी येते. सरावानंतर कॉलेज आणि आईलाही मदत करते. तिच्या ‘डायट’साठी महिन्याला किमान पाच हजार रुपयांची आवश्यकता आहे. परंतु मदत कुणाकडूनही मिळत नसल्याने काजल निराश झाली आहे. आर्थिक बळ मिळवण्यासाठी तिची लोकप्रतिनिधींकडे, जिल्हा क्रीडा अधिकाºयांकडे, मुख्यमंत्री कार्यालयाकडे धावपळ सुरू आहे.कुस्तीचे प्रचंड आकर्षणकाजल मुळात कबड्डीपटू. परंतु घराजवळ असलेल्या मुलांच्या आखाड्यात तिला कुस्तीबद्दल आकर्षण निर्माण झाले. तिने प्रशिक्षकाला विनंती करून, कुस्तीचे डावपेच शिकले आणि अवघ्या तीन महिन्यात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पटकाविले. तिने गावांमध्ये होणाºया दंगलीत पुरुषांनाही धोबीपछाड दिली आहे.तर कसे घडणार खेळाडू?स्ट्रगलर खेळाडूंसाठी मदतीचे शासनाचे धोरणच नाही. १२ जुलै २०१६ च्या जीआरमध्ये आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत डीपीसीतून खेळाच्या मदतीसाठी तरतूद आहे. परंतु यात केवळ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. क्रीडा स्पर्धा, क्रीडा मंडळ यांना आमदार आपल्या निधीतून मदत करू शकतात. परंतु राज्यस्तरावर खेळल्यानंतरही एखाद्या स्ट्रगलर खेळाडूला मदतीचे धोरण नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सुद्धा अशा खेळाडूंच्या मदतीसाठी कुठलीही योजना नाही.समाजाने पुढे यावेऐन उमेदीच्या काळात केवळ आर्थिक पाठबळामुळे आपले करिअर अडचणीत येत असल्याची खंत काजलच्या चेहºयावर स्पष्ट दिसत आहे. शासन व लोकप्रतिनिधींकडून निराश झालेल्या अशा गुणवंत व मेहनती खेळाडूंना घडविण्यासाठी आता समाजानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकी जपणाºयांनी तिच्या मदतीसाठी पुढे यायला हवे. काजलला मदत करायची असल्यास बँक आॅफ महाराष्ट्राच्या वर्धमाननगर शाखेतील ६०२२९०४४०७७ या खात्यावर मदत क रता येईल किंवा तिला ७८४१८४२४०० या क्रमांकावर संपर्क करता येईल.
‘दंगल गर्ल’ला हवेय आर्थिक बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:25 AM
आमिर खानच्या गाजलेल्या दंगल चित्रपटातील गीता-बबिता आपल्या डावपेचाच्या बळावर जशा पुरुष कुस्तीपटूंना धूळ चारतात तशीच ‘धाकड’ कुस्तीपटू आपल्या नागपुरातही आहे.
ठळक मुद्देपुरुषांनाही देते धोबीपछाड : पारडीवरून रोज सायकलने गाठते यशवंत स्टेडियम