शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

धोकादायक माओवादी साईबाबाला पॅरोल नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 12:08 PM

आजारी आईचा मृत्यू झाल्यामुळे आपात्कालीन पॅरोल मिळावा याकरिता धोकादायक माओवादी जी. एन. साईबाबाने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावली.

ठळक मुद्देनागपूर कारागृहात भोगत आहे जन्मठेपेची शिक्षा

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजारी आईचा मृत्यू झाल्यामुळे आपात्कालीन पॅरोल मिळावा याकरिता धोकादायक माओवादी जी. एन. साईबाबाने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला.देशाविरुद्ध केलेले गंभीर गुन्हे आणि सध्याची कोरोना संक्रमणाची परिस्थिती पाहता साईबाबाला पॅरोल नाकारण्यात आला. परंतु, त्याला कुटुंबीयांसोबत भेट व आवश्यक रीतिरिवाज पूर्ण करण्यासाठी एका दिवसाकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स करण्याची परवानगी देण्यात आली. साईबाबा माओवादी चळवळीचा मास्टर माईन्ड असून पोलीस कारवाई होण्यापूर्वी तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. माओवाद्यांनी घडवून आणलेल्या विविध घातपातांशी त्याचा प्रत्यक्ष संबंध होता, याचे पुरावे पोलिसांना आढळून आले आहेत.

७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व अन्य आरोपींना बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यांतर्गत आजन्म कारावासाची कमाल शिक्षा सुनावली आहे. आरोपीविरुद्ध दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्हे सिद्ध झाले आहेत.

साईबाबा सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याची आई अनेक दिवसांपासून आजारी होती. तिचे १ आॅगस्ट रोजी निधन झाले. त्यामुळे आपात्कालीन पॅरोल मिळण्यासाठी त्याने सुरुवातीला विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. हैदराबाद पोलिसांनी विरोधात अहवाल दिल्यामुळे त्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला. परिणामी, त्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. साईबाबातर्फे अ‍ॅड. मिहीर देसाई तर, सरकारतर्फे अ‍ॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय