लोकमत न्यूज नेटवर्ककन्हान : अवैधपणे शस्त्र विकणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन माऊझर, चार काडतूस जप्त करण्यात आले. कन्हान परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.अब्दुल फारुख अब्दुला शेख मंसुरी (२२), मो. नाहीद ऊर्फ हमजा बब्बू सय्यद (२३) दोघेही रा. कांद्री कन्हान, चेतन रमेश कोल्हे (२३, रा. दुर्गानगर, कन्हान, ह.मु. नरसाळा नागपूर) आणि मोहन राजू पनीकर (४२, रा. इंदिरानगर कन्हान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.फारुख हा कन्हानमध्ये व्हॉटसअॅपद्वारे शस्त्रास्त्रांचे छायाचित्र पाठवून शस्त्रे विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुरुवारी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला छायाचित्र दाखवून त्याबाबत विचारले असता जबलपूर येथून माऊझर आणल्याची कबुली त्याने दिली.तसेच त्याचा साथीदार मोहम्मद नाहीद हा कांद्री झोपडपट्टीच्या मागे माऊझर विक्रीसाठी घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने झोपडपट्टी परिसरात शोध घेतला असता तो संशयास्पदरीत्या आढळून आला. त्यामुळे त्याला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे माऊझर आणि दोन काडतूस आढळून आले. त्यानंतर चेतनला ताब्यात घेऊन विचारणा केल्यावर त्याने मोहन पनीकरला एक माऊझर विकल्याचे सांगितले. त्यावरून मोहनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून माऊझर आणि दोन काडतूस जप्त केले.या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अवैधपणे शस्त्रांस्त्रांची विक्री करण्याचे तसेच शस्त्रास्त्र बाळगल्यावरून भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण कन्हान पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उल्हास भुसारी, पुरुषोत्तम अहेरकर, सहायक फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, पोलीस हवालदार जयप्रकाश शर्मा, राजेंद्र सनोडिया, ज्ञानेश्वर राऊत, बाबा केचे, प्रमोद बन्सोड, संतोष पंधरे, मदन आसतकर, नीलेश बर्वे, सूरज परमार, दिलीप लांजेवार, नायक पोलीस शिपाई सुरेश गाते, रामा आडे, शैलेश यादव, पोलीस शिपाई राधेश्याम कांबळे, प्रणय बनाफर, अमोल वाघ, विशाल चव्हाण, नीतेश रोहणकर, चालक साहेबराव बहाळे, अमोल कुथे, महिला शिपाई नम्रता बघे यांनी पार पाडली.
दोन माऊझरसह काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:11 AM
अवैधपणे शस्त्र विकणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन माऊझर, चार काडतूस जप्त करण्यात आले.
ठळक मुद्देचार जणांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कन्हानमध्ये धडक कारवाई